Raju Srivastav
मुंबई 14 ऑगस्ट: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं होतं. सध्या त्यांच्या प्रकृतीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. त्यांचा ब्रेन MRI रिपोर्ट नुकताच समोर आला असून त्यांच्या प्रकृतीत सुधार व्हायला अजून काही दिवस लागतील असं सांगितलं जात आहे. राजू यांच्या भावाने त्यांच्या आरोग्याशी निगडित (raju srivastav) एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजू यांचा रात्री ब्रेन MRI करण्यात आला आहे. राजू यांचा भाऊ दिपूच्या सांगण्यानुसार डॉक्टर त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार राजू यांची एक नस दबली गेली आहे. आणि त्यांना रिकव्हर करायचे सगळे प्रयत्न केले जात आहेत. त्यांना पूर्णतः बरं व्हायला काही काळ लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यासाठी आठवडा ते 10 दिवस लागू शकतात अशीही माहिती मिळत आहे. त्यांचे चाहते सध्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. ट्विटरपासून अगदी सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. राजू यांना भेटायला परवनगी नाही सध्या राजू यांची नाजूक हालत बघता त्यांना भेटायची परवानगी कोणालाही दिलेली नाही. त्यांच्या आरोग्याशी निगडित ही घटना घडल्यावर त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीला पोहोचलं असून राजू यांना भेटायला आणि बघायला मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना भेटायला बरीच गर्दी जमलंच सुद्धा समजत आहे. पण डॉक्टरांनी त्यांना भेटायची परवानगी नाकारली असल्याचं कळत आहे. सध्या राजू यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. हे ही वाचा- Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांची मोठी हेल्थ अपडेट आली समोर, जवळच्या मित्राने दिली माहिती राजू यांच्या हेल्थबद्दल वेगवेगळ्या प्रकारची बातमी अनेक दिवस समोर येत आहे. त्यांची अवस्था फारच बिकट आहे आणि त्यांचं निधन झालं आहे अशा अनेक बातम्या सर्वत्र पसरताना दिसत होत्या मात्र राजू यांच्या निकटवर्तीयांनी आणि मित्रमंडळींनी या सगळ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन चाहत्यांना आणि प्रेक्षकांना केलं आहे.
त्यांची हालत नाजूक आहे पण हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसत असल्याचं नुकतंच त्यांचे मित्र सुनील पाल आणि एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तसंच अभिनेते शेखर सुमन यांनी सुद्धा ट्विट करून राजू ठीक असल्याचा अपडेट दिला आहे.