कपिल शर्मा
मुंबई, 24 ऑक्टोबर : घराघरात लक्ष्मीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारपेठेतील रस्तेही ग्राहकांनी गजबजले आहेत. बॉलिवूडमध्येही दिवाळीच्या पार्टींचं जोरदार आयोजन होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी दिवाळी पार्टी होस्ट केलेली पहायला मिळाली. दिवाळीच्या पार्ट्यांमध्ये सेलेब्स आपल्या फॅशनचा जलवा दाखवत आहेत. नुकतंच गुलशन कुमार यांचे भाऊ कृष्ण कुमार यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कॉमेडियन कपिल शर्माही पत्नी गिन्नी चतरथसोबत या पार्टीत सहभागी झाला होता. या पार्टीतला त्याचा एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो पत्नीसोबत रोमॅंन्टिक झालेला दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कपिलने पापाराझीसमोर पत्नीला किस केलं. कपिलचा हा रोमँटिक स्टाईल पाहून गिन्नीही हैराण झाली. कपिलचे अचानक प्रेम पाहून गिन्नीलाही धक्का बसला आणि कपिलला पाहून ती लाजली. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या कपिल शर्माच्या चाहत्यांनीही ‘वन्स मोअर, वन्स मोअर’ केलेलं पहायला मिळालं. हेही वाचा - Diwali 2022: दिवाळी वर्षातून 3 वेळा…. श्रद्धा कपूरने ट्रॅडिशनल लुकमध्ये व्यक्त केली अनोखी इच्छा कपिल आणि गिन्नीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. ‘शर्मा जी शर्मा गए, दोघंही क्युट आहे, कपडे छान घातलेत’, अशा अनेक कमेंट येत आहेत.
दिवाळी पार्टीत कपिल आणि गिन्नी क्रीम कलरच्या पोशाखात दिसले. गिन्नीने क्रीम रंगाचा सिल्क सूट घातला होता, जो तिने मल्टी कलरच्या दुपट्ट्यासोबत मॅचिंग केला होता. कपिल क्रीम कलरच्या कुर्ता-पायजामामध्ये खूपच सुंदर दिसत होता. कपिल शर्मा त्याच्या चाहत्यांचा लाडका आहे. कपिलला नेहमीच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे, आता या दोघांच्या व्हिडिओवरही चाहते प्रेम देत आहेत.
दरम्यान, कपिल शर्मा आणि त्याची पत्नी कॉलेजच्या काळापासून म्हणजे 2005 पासून एकमेकांना आवडायचे. दोघांमध्ये खूप प्रेम होते. पण करिअरच्या चढ-उतारांदरम्यान कपिल आणि गिन्नीमध्ये दुरावा आला. मात्र, नंतर जेव्हा कपिल यशस्वी झाला तेव्हा त्याने त्याच्या प्रेमाला आणखी एक संधी दिली आणि आज दोघेही प्रेमात आनंदाने एकत्र राहतात.