Bhagya dile tu mala serial's actor vivek sanagale and tanvi mundale
मुंबई, 15 जुलै: कलर्स मराठीवरील (Colours marathi) ‘भाग्य दिले तू मला’ (Bhagya dile tu mala ) या मालिकेने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. राजवर्धन आणि कावेरी यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील कावेरी आणि राज म्हणजेच काकू आणि बोका यांची भांडणं , मस्ती बघायला प्रेक्षकांना आवडत आहे. राज आणि कावेरी यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर मस्त आहेच पण ते सेटवर ऑनस्क्रीन मस्तीसुद्धा तेवढीच करतात. त्या दोघांचे बरेच मजेशीर व्हिडीओ आणि फोटोज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता त्यांचा असाच एक धमाल व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कावेरी राजवर्धनला चक्क साडी नेसवताना दिसत आहे. राजही तिच्याकडून काही न बोलता आनंदाने साडी नेसून घेत आहे. काकू आणि बोक्याच्या या धमाल मस्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राजवर्धनला असं नक्की काय झालं कि तो चक्क साडी नेसवून घेत आहे असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर मालिकेच्या येत्या भागातच असं दाखवण्यात येणार आहे. वैदेहीला नऊवारी साडी नेसायची असते त्यासाठी ती कावेरीला मदत मागते. तिला नऊवारी साडी नेसून दाखवण्यासाठी कावेरी राजला तयार करते. आणि वैदेहीला व्हिडीओ कॉल करून ती चक्क राजला मॉडेल बनवून नऊवारी साडी नेसून दाखवते.
भाग्य दिले तू मला मालिकेत आता कावेरी आणि राज या दोघांमध्ये मैत्रीचं नातं हळूहळू खुलू लागलं आहे. मालिकेतील या ट्रेकला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आता मालिकेमध्ये कावेरीच्या मध्यस्थीने राज आणि रत्नमाला यांचे नाते कसे जुळते ते बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मालिकेमध्ये शूटिंग सुरु असताना मात्र कलाकार सेटवर मजा मस्ती करताना पाहायला मिळतात. हे हि वाचा - Lalit Modi First wife: आईच्या मैत्रिणीशीच केलं होतं लग्न, सुष्मिता सेनबरोबरच्या अफेअरने पुन्हा वादात अडकला IPL Founder भाग्य दिले तू मला मालिकेत राजवर्धनची भूमिका अभिनेता विवेक सांगळे साकारत आहे. त्याचबरोबर कावेरीच्या भूमिकेत तन्वी मुंडले तर रत्नमालाची भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ साकारत आहेत.