JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कॉफीचा मग हातात घेऊन सहकलाकारांसह थिरकली प्रार्थना बेहरे; Coffee Ani Barach Kahi म्हणत शेअर केला VIDEO

कॉफीचा मग हातात घेऊन सहकलाकारांसह थिरकली प्रार्थना बेहरे; Coffee Ani Barach Kahi म्हणत शेअर केला VIDEO

प्रार्थनानं शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेकांना ‘कॉफी आणि बरंच काही’ सिनेमाची आठवण झाली. पाहा प्रार्थना आणि भूषणचा (Prarthana behere & bhushan prathan) तो VIDEO.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै : ‘कॉफी आणि बरंच काही’, (Coffee Ani Barach Kahi)‘मितवा’ (Mitwaa) यांसारखे हिट चित्रपट देणारी प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) चांगलीच लोकप्रिय आहे. तीनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. सध्या प्रार्थना झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या (Mazhi Tuzhi Reshimgath) मालिकेत काम करत आहे. या मालिकेत प्रार्थना नेहाची भूमिका साकारत असून नेहाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. प्रार्थना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशीही संवाद साधताना दिसते. नुकतंच प्रार्थनानं तिच्या इन्स्टाग्रामवर (Prarthana Behere Instagram)एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्रार्थनानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या ‘कॉफी आणि बरंच काही’ सिनेमातील गाणं वाजताना ऐकू येतंय. याशिवाय व्हिडीओमध्ये प्रार्थना, अभिनेता भूषण प्रधान (bHUSHAN Prahan), अभिनेत्री काजल काटे (Kajal Kate), शमिका भिडे आणि पल्ल्वी भिडे पहायला मिळत आहे. सगळे मस्त कॉफी पीत डान्स (Dance Video) करत आहे. सगळेजण आनंदी मूडमध्ये दिसत असून कॉफी पीत गाण्याचा आनंद घेतायेत. हेही वाचा -  Bharti Singh baby Laksh’s photo: अखेर भारती सिंगने दाखवला ‘गोला’चा चेहरा; कसा दिसतो लक्ष्य पाहा PHOTO प्रार्थनानं शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेकांना ‘कॉफी आणि बरंच काही’ सिनेमाची आठवण झाली. यामध्ये प्रार्थनानं व्हिडीओलाही तेच कॅप्शन दिलं आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ म्हणत प्रार्थनानं पुढे चार, पाच हर्ट इमोशी टाकले आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये असेला भूषणही या सिनेमात प्रार्थनासोबत झळकला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक भन्नाट कमेंट येताना दिसतायेत.

संबंधित बातम्या

दरम्यान, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे (Shreyash Talpade) हा यशची भूमिका साकरत आहे. तर नेहाची भूमिका ही प्रार्थना बेहरे साकारत आहे. यातील यश आणि नेहाची केमिस्ट्री सर्वांना फार आवडताना दिसते. या मालिकेमुळे नेहा म्हणजेच प्रार्थना तर चर्चेत असतेच मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या