JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / SHOCKING! कास्टिंग डायरेक्टर क्रिष कपूरचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन

SHOCKING! कास्टिंग डायरेक्टर क्रिष कपूरचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन

कृष कपूरनं महेश भट यांचा ‘जलेबी’ आणि कृति खरबंदाचा वीरे द वेडिंग सारख्या सिनेमांसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. शिवाय काही वेब सीरिजसाठीही तो काम करत होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जून : बॉलिवूडसाठी 2020 हे वर्ष अनेक दुःखद घटना घेऊनच आलं आहे. एप्रिलच्या अखेरीस इरफान खानच्या निधनापासून सुरू झालेली ही निधन वार्तांची साखळी अद्याप तुटलेली नाही. आज कास्टिंग डायरेक्टर कृष कपूरनं वयाच्या 28 वर्षीच जगाचा निरोप घेतला. सुरुवातीला अपघातात कृष कपूरचं निधन झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आता त्याचं निधन ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. कास्टिंग डायरेक्टर कृष कपूरनं महेश भट यांचा ‘जलेबी’ आणि कृति खरबंदाचा वीरे द वेडिंग सारख्या सिनेमांसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. याशिवाय वेब सीरिज शुभ रात्री आणि अशा अन्य काही प्रोजेक्टवरही त्यानं काम केलं होतं. कृषचे मामा सुनील भल्ला यांनी न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, त्यांचा भाचा कृषचं निधन ब्रेन हॅमरेजमुळे झाले आहे. त्यांनी सांगितलं, कृष घरीच बेशुद्ध झाला. त्याची कोणत्याही प्रकारची मेडिकल हिस्ट्री नव्हती तो अचानक बेशुद्ध झाला आणि त्याच्या शरीरातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कृष विवाहित होता आणि त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि 7 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार अन्वर सागर यांचं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. मात्र अद्याप त्यांच्या निधनाचं कारण समजू शकलेलं नाही. याशिवाय अगदी दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचंही वयाच्या 42 वर्षी किडनी विकारानं निधन झालं. त्यांनी सलमानच्या अनेक सिनेमांसाठी संगीतकार म्हणून काम पाहिलं होतं. अन्य बातम्या बॉलिवूडवर शोककळा, ज्येष्ठ दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचं निधन …अन् एका क्षणात 8 घरं समुद्रात वाहून गेली, पाहा भूस्खलनाचा थरारक LIVE VIDEO कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये आली चांगली बातमी; जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या