Hritik Roshan's movie Vikram Vedha
मुंबई 14 ऑगस्ट: बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाच्या माध्यमातून दमदार आगमन केलं असलं तरी चित्रपटाला मात्र फारसा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे. सिनेमा रिलीजआधीच अनेक नकारात्मक चर्चांमध्ये आल्याने लॉन्ग वीकेंड असूनही चित्रपटाला तुरळक गर्दी झाल्याचं समोर आलं आहे. आमिरच्या सिनेमामुळे आता अभिनेता हृतिक रोशन सध्या बराच चर्चेत येत आहे. कारण आहे हृतिकने सिनेमाचं केलेलं कौतुक. हृतिकने नुकताच लाल सिंग चड्ढा सिनेमाबद्दल आपला मनमोकळा रिव्ह्यू दिला ज्यामुळे तो सध्या ट्रोल होताना दिसत आहे. हृतिकने आमिरच्या सिनेमाचं भरभरून कौतुक करत लिहिलं, “आत्ताच लाल सिंग चड्ढा सिनेमा पाहिला. त्यामागची निर्मळ खरी भावना जाणवली. चूक किंवा बरोबर हे सगळं बाजूला ठेवून सिनेमा प्रत्येकाने नक्की पाहावा. अजिबात चुकवू नका.” त्याने ट्विट केल्यानंतर काहीच वेळात ट्विटरवर ‘boycottvikramvedha असा ट्रेंड सुरु झाला. अनेकांना त्याने आमिरच्या सिनेमाचं केलेलं कौतुक पटलं नसल्याचं सुद्धा म्हटलं आहे. सध्या लाल सिंग चड्ढा सिनेमाला घेऊन वातावरण फारच तापलेलं आहे. आमिरच्या या सिनेमावर बहिष्कार टाकावा अशी मागणी ठिकठिकाणाहून केली जात आहे. यात आता हृतिकने त्याची बाजू घेत कौतुक केल्याने हृतिकच्या आगामी सिनेमाला सुद्धा बॉयकॉट करण्यात यावं अशी मागणी नेटकरी करताना दिसत आहेत. हे ही वाचा- बॉलिवूडचे बडे स्टार KGF 2 च्या Yash समोर फेल; रिलीजनंतरही रॉकीची जादू कायम बॉलिवूडची सध्याची अवस्था बघता बॉलिवूडचा शेवट जवळ आलाय असं सुद्धा मत अनेकांनी मांडलं आहे. अनेकांनी ‘हाच सपोर्ट काश्मीर फाईल्सच्या वेळी का नाही दाखवला’ असा प्रश्न विचारात ह्रतिकला धारेवरच धरलं आहे. सध्या अनेक कारणांनी बॉलिवूडचे सिनेमे अपयशी होताना दिसत आहेत. तसंच बॉलिवूडच्या अभिनेत्याचे येणारे सिनेमे सुद्धा बॅन करायच्या तयारीत नेटकरी असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान विक्रम वेधा बद्दल सांगायचं तर हा मूळ तमिळ सिनेमा ज्यामध्ये आर माधवन आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका होत्या त्याचा हिंदी रिमेक आहे. यामध्ये हृतिक एका डॅशिंग अंदाजात दिसून येणार आहे तर त्याच्यासह सैफ अली खान सुद्धा दिसून येणार आहे. हा सिनेमा पुष्कर गायत्री या जोडीने दिग्दर्शित केला आहे. या मूळ तमिळ सिनेमाला खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता. आता या बॉयकॉटच्या धर्तीवर हृतिकचा हा सिनेमा चालणार का हे येत्या काळात पाहावं लागेल.