मुंबई, 13 जुलै : आज शुक्रवार आहे. त्यामुळे या वीकेण्डला दोन मराठी सिनेमे आणि एक हिंदी सिनेमा बॉक्सऑफीसवर आपल्या भेटीला आला आहे. सूरमा हा हॉकी लेजंड संदीप सिंग यांचा बायोपिक आहे. दिलजीत दोसंज आणि तापसी पन्नू यांची जोडी यानिमित्ताने प्रथमच दिसतेय. तर लेखन-दिग्दर्शन केलंय. शाद अली यांनी यासोबत मराठीत लेथ जोशी हा अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजलेला मराठी सिनेमा प्रदर्शित झालाय. यात चित्तरंजन गिरी आणि आश्विनी गिरी ही रिअल लाईफ जोडी सिनेमात झळकतेय. याचं दिग्दर्शन मंगेश जोशी यांनी केलंय.
यासोबत आणखी एक मराठी सिनेमा भेटीला आलाय तो म्हणजे ‘डार्य डे’ आणि ब्रेकअपची हलकीफुलकी कहाणी यात दाखवली आहे. ऋत्विक केंद्रे, मोनालिसा यांची जोडी यात दिसतेय. तर दिग्दर्शन केलंय पांडुरंग जाधव यांनी