ऐश्वर्यासाठी एकमेकांशी भिडलेले सलमान खान-विवेक ऑबेरॉय
मुंबई, 11 एप्रिल- बॉलिवूड आणि काँट्रीव्हर्सी यांचा फार जुना संबंध आहे. इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकार कधी ना कधी कॉंट्रोव्हर्सीमुळे चर्चेत आलेले आहेत. यामध्ये अशा काही कॉंट्रोव्हर्सी आहेत ज्या कित्येक वर्षे उलटली तरी तितक्याच ताज्या आहेत. यामध्ये सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामध्ये घडलेल्या घटनेचासुद्धा समावेश आहे. ही कॉंट्रोव्हर्सी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयमुळे घडली होती हे सर्वांनाच माहिती आहे. ऐश्वर्या आणि सलमान खान यांचं नातं जवळजवळ संपत आलं होतं. आणि अशातच विवेक ओबेरॉयने या दोघांमध्ये एन्ट्री करत नवा वाद निर्माण केला होता. पाहूया नेमकं काय घडलं होतं. सलमान-ऐश्वर्याच्या नात्याची सुरुवात- 1999 मध्ये आलेला ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांनतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.
काहीच दिवसांत दोघांचं नातं जगासमोर आलं होतं. दोघेही लवकरच लग्नसुद्धा करतील असा अंदाज बांधला जात होता. परंतु या दोघांमध्ये असं काही घडलं की आजपर्यंत दोघांनी एकमेकांचं तोंड पाहिलं नाही. ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याची आजही चर्चा होत असते. दोघेही एकेमकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, लोक त्यांच्या लग्नाची वाट पाहात होते. परंतु या दोघांनी जेव्हा एकेमकांना डेट करायला सुरुवात केली, तेव्हा सलमान ऐश्वर्याच्या बाबतीत फारच पझेसिव्ह असल्याचं सांगितलं जातं. इतकंच नव्हे तर सलमानने ऐश्वर्यावर हात उचलल्याचं आणि तिच्या सेटवर जाऊन धिंगाणा घातल्याचंही म्हटलं जातं. आणि याच कारणांमुळे सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आला होता. या दोघांचं नातं जवळजवळ संपत आलं होतं. सलमान आपल्या नात्याला आणखी एक संधी मिळण्याची प्रतीक्षा करत होता. मात्र अशातच या दोघांमध्ये विवेक ओबेरॉयची एंट्री झाली होती. (हे वाचा:
भर पार्टीत मिका सिंगने राखी सावंतला जबरदस्ती केलेलं KISS; 17 वर्षानंतर गायकाची कोर्टात धाव
) विवेक ओबेरॉय-ऐश्वर्या राय- सलमान खानसोबत नात्यात दुरावा आल्यानंतर ऐश्वर्या राय आपल्या कामात मग्न झाली होती.अशातच ऐश्वर्या रायने विवेक ओबेरॉयसोबत ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. दरम्यान, विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीकता वाढू लागली. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. ही बाब सलमान खानला समजल्यावर तो चांगलाच संतापला. तो विवेकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करु लागला होता. मीडिया रिपोर्टनुसार सलमान खानने विवेकला तब्बल 41कॉल केले होते. सलमान खान-विवेक ऑबेरॉय- 1 एप्रिल 2003 मध्ये विवेक ओबेरॉयने चक्क पत्रकार परिषद बोलावून सलमान खानवर गंभीर आरोप केले होते. यामध्ये विवेकने सांगितलं की, काल रात्री 12.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सलमान खानने मला 41 वेळा कॉल केलं आहे. मला सलमान खानने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर इंडस्ट्रीत वातावरण चांगलंच तापलं होतं. इतकंच नव्हे तर या दरम्यान विवेकने सलमानला म्हातारा आणि चिडकासुद्धा म्हटलं होतं. विवेकला वाटलं होतं की, ऐश्वर्या यामध्ये त्याला पाठिंबा देईल परंतु असं काहीच झालं नाही. हा डाव विवेकवरच उलटला. ऐश्वर्या त्याच्यावर प्रचंड संतापली होती. आपल्या नात्याबाबत मीडियामध्ये असं सांगणं तिला अजिबात रुचलं नाही. तिने विवेकसोबतसुद्धा आपलं नातं संपवलं. अशातच विवेकने सलमानसोबतही पंगा घेतला होता. या सर्वांमध्ये विवेकचं करिअर धुळीला मिळालं होतं. त्यानंतर विवेकने एका कार्यक्रमात सलमानची माफी मागण्याचा प्रयत्न केला होता परंतु सलमानने त्याकडे लक्ष नाही दिलं.