बोनी कपूरच्या दोन्ही पत्नी होत्या रविना टंडनच्या खास मैत्रिणी
मुंबई, 20 मे- 80-90 च्या दशकातील बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींबाबत बोलायचं झालं तर, श्रीदेवी यांचं नाव सर्वातब आधी घेतलं जाईल. साऊथ सिनेसृष्टीतून बॉलिवूडमध्ये आलेल्या श्रीदेवी यांनी आपल्या काळात अफाट स्टारडमचा पाहिलं आहे. त्यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टारदेखील म्हटलं जातं.असं म्हटलं जातं की, चित्रपटात श्रीदेवीच्या उपस्थितीमुळे मोठे सुपरस्टार्सदेखील घाबरायचे. श्रीदेवी त्या काळातील टॉप अभिनेत्री राहिली आहे. श्रीदेवीने रवीना टंडन सोबत 1994 मध्ये आलेल्या ‘लाडला’ चित्रपटात काम केलं होतं. यादरम्यान रवीना टंडन आणि श्रीदेवी खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. रविना टंडन ही अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे जी, आजही पडद्यावर तितकीच सक्रिय आणि फिट आहे. रविना टंडनचं सौंदर्य आजही जसच्या तसं आहे. लाखो तरुण अभिनेत्रीवर फिदा आहेत. रविना टंडन सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. ती सतत इन्स्टाग्रामवर आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. या अभिनेत्रीकडे पाहुजन वय हा केवळ आकडा हे सिद्ध होतं. रविना नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. (हे वाचा: ‘Taarak Mehta मधील जुन्या कलाकारांना परत आणा’; सोशल मीडियावर सुरु झाला नवा ट्रेंड, नेमकं काय करताहेत लोक? ) नुकतंच रवीना टंडनने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रवीना टंडनने सांगितलं होतं की, लाडला चित्रपटाचे निर्माता बोनी कपूर होते. मला श्रीदेवी यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. माझी त्यांच्याशी खूप चांगली मैत्री झाली होती. मी कधीही त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊ शकत होते. श्रीदेवी स्वत: माझ्या व्हॅनमध्ये मला येऊन भेटायच्या. अनेकवेळा व्हॅनचं दार ठोठावत मेकअप झाला का? असं मला विचारायच्या’. मेकअप झालं असेल तर, मग चल माझ्या व्हॅनमध्ये बसून रिहर्सल करु असं त्या म्हणायच्या. सेटवर प्रत्येकजण मला चिडवायचे की तुला थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाण्याची परवानगी आहे. रवीना टंडनने सांगितलं की, त्याच वेळी निर्माता बोनी कपूर देखील सेटवर असायचे. बोनी कपूर यांच्या एक्स पत्नी मोना कपूरदेखील रविनाची खास मैत्रीण होती. रवीना म्हणाली, ‘लाडलाच्या वेळी मोना माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्याच वेळी, चित्रपटाच्या सेटवर माझी श्रीदेवीशीही चांगली मैत्री झाली होती’.
बोनी कपूर यांनी मोनाला घटस्फोट देऊन श्रीदेवीशी लग्न केलं होतं. त्यावेळी बोनी कपूर आणि मोना यांना दोन मुले होती. त्यातील अर्जुन कपूर एक बॉलिवूड अभिनेता आहे. आणि त्याची बहीण अंशुला कपूर देखील फॅशन डिझायनर आहे. बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न केलं आणि या दोघांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. जान्हवी आणि खुशी यांनाही त्यांच्या आईप्रमाणे अभिनेत्री व्हायचं आहे. जान्हवी याआधीही अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तर दुसरीकडे खुशी कपूरदेखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.