JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सामंथा अक्किनेनीने सारा अली खान आणि रकुल प्रीतला म्हटले Sorry, हे आहे कारण

सामंथा अक्किनेनीने सारा अली खान आणि रकुल प्रीतला म्हटले Sorry, हे आहे कारण

सामंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni) तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या #SorrySara आणि #SorryRakul यामध्ये भाग घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर : दक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) ने सोशल मीडियावर पर सारा अली खान (Sara Ali Khan) आणि रकुल प्रीत सिंहची (Rakul Preet Singh) माफी मागितली आहे. सामंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या #SorrySara आणि #SorryRakul यामध्ये भाग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अशा चर्चांना उधाण आले की, रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ने नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोला दिलेल्या तिच्या जबाबात काही बॉलिवूड कलाकारांचे नाव घेतले आहे, जे ड्रग्जच्या व्यवहारात सामील होते. या कलाकारांमध्ये  सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या दोघींची नावं आहेत, अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. मात्र आता स्वत:  एनसीबीचे डायरेक्टर डायरेक्टर यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर युजर्स सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंहची माफी मागत आहेत. #SorrySara आणि #SorryRakul हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. अशावेळी सामंथाने देखील हे हॅशटॅग पोस्ट करत या प्रकरणी सारा आणि रकुलचे नाव आल्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. (हे वाचा- अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे PHOTOS VIRAL; बाळाच्या जन्मानंतर घालणार लग्नाचा घाट) सुशांत सिंह राजपूत प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये एनसीबीने सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी याआधी एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना देखील अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. अशामध्ये असे वृत्त समोर आले होते की रियाने ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील काही कलाकारांची नाव घेतली आहेत. सारा आणि रकुलचे नाव प्रामुख्याने समोर आले होते. (हे वाचा- ड्रग्ज प्रकरणात सारा अली खान, सिमॉन यांना समन्स? अखेर NCB ने केला खुलासा ) सोशल मीडियावर सारा आणि रकुलला यावरून ट्रोल देखील करण्यात आले, त्यांच्यावर खूप मीम्स देखील शेअर केले गेले. एनसीबीचे डायरेक्टर केपीसी मल्होत्रा यांनी हे वृत्त फेटाळले आहे आणि असे म्हटले की एनसीबीने असा कोणताही रिपोर्ट बनवला नाही आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर #SorryRakul, #SorrySara ट्रेंड करत आहे. काही कलाकारांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या