नितीन मनमोहन
मुंबई, 29 डिसेंबर : बॉलिवूड चे प्रसिद्ध निर्माते नितीन मनमोहन यांच्याविषयी दुःखद बातमी समोर आली आहे. नितीन मनमोहन यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. मात्र आज त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 15 दिवसांपासून निर्माते नितीन मनोहन रुग्णालयात व्हेंटिलेटवर होते. त्यांना दुसऱ्यांदा हृदविकाराचा झटका आला होता. ते लवकर ठीक व्हावेत म्हणून मित्र-परिवार, कुटुंब चाहते प्रार्थना करत होते. मात्र अखेर त्यांनी आज 29 डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे मनोरंजन विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. अनेकजण त्यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. हेही वाचा - नवरा आणि मुलीच्या डोळ्यादेखतच प्रसिद्ध अभिनेत्रीवर गोळीबार, जागीच मृत्यू नितीनने लाडला, बोल राधा बोल, लाडला, यमला पगला दिवाना, आर्मी, स्कूल, लव के लिए कुछ भी करेगा, दस, चल मेरे भाई यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या चित्रपटांच्या जादूनं प्रेक्षकांच्या मनात त्यांचं एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
दरम्यान, नितीन मनमोहन हे प्रसिद्ध अभिनेते मनमोहन यांचा मुलगा होते. मनमोहन यांनीही अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. वडिलांप्रमाणे नितीनदेखील चित्रपटसृष्टीत सक्रिय होते.