JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कॅटरिनाने केला हॉट डान्स, VIDEO होतोय व्हायरल! Bollywood | katrina kaif | Dance,

कॅटरिनाने केला हॉट डान्स, VIDEO होतोय व्हायरल! Bollywood | katrina kaif | Dance,

अभिनेत्री कॅटरिना कैफचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 जून: सलमान खान सोबत ‘भारत’ चित्रपटामुळे चर्चेते आलेली अभिनेत्री कॅटरिना कैफचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कॅटरिनाने धमाकेदार असा डान्स केला आहे. रेड शिमरी ड्रेसमध्ये कॅटरिनाने शानदार असा डान्स केला आहे. विशेष म्हणजे हाच ड्रेस कॅटरिनाने फेमिना मिस इंडियाच्या फायनलमध्ये घातला होता. सध्या कॅटचा हा हॉट डान्स सोशल मीडियावर चर्चेत आहे आणि व्हायरल देखील होत आहे. उत्तराखंडमधील एका विवाह सोहळ्यात कॅटसह अन्य स्टार उपस्थित होते. उत्तराखंडमधील औली येथे हा विवाहसोहळा पार पडला. कॅटरिनाच्या डान्समुळे या विवाहसोहळ्याची चर्चा देशभरात सुरु झाली आहे. कॅटने झीरो चित्रपटातील ‘हुस्न परचम’ या गाण्यावर डान्स केला. तिचा हा व्हिडिओ एका फॅनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओत कॅटचा लाल रंगाचा ड्रेन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ग्रुप डान्समध्ये कॅटसोबत अन्य कलाकार देखील दिसत आहेत.

कॅटरिनाशिवाय या विवाह सोहळ्यात रॅपर आणि गायक बादशाह याने देखील स्टेजवर उपस्थिती दाखवली. बादशाहच्या गाण्यावर कॅटने डान्स केला. या दोघांच्या उपस्थितीमुळे विवाहासाठी आलेल्या मंडळी देखील थिरकताना दिसले. विवाह सोहळ्यात नागिन मालिकेतील सुरभी ज्योती देखील उपस्थित होती. सुरभीने पद्मावत चित्रपटातील पिंगा या गाण्यावर डान्स केला. कॅटच्या व्हिडिओ सोबत सुरभीचा डान्स देखील चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या