JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लेकीसोबत पोज देताना दिसली प्रियांका चोप्रा; मालतीसोबत घेतेय निसर्गाचा आनंद

लेकीसोबत पोज देताना दिसली प्रियांका चोप्रा; मालतीसोबत घेतेय निसर्गाचा आनंद

सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली बॉलिवूड (Bollywood & Hollywood) अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाल्यापासून प्रचंड आनंदी आहे. प्रियांका आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून आपली लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत सुंदर वेळ घालवते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जुलै- सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली बॉलिवूड  (Bollywood & Hollywood)  अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाल्यापासून प्रचंड आनंदी आहे. प्रियांका आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून आपली लेक मालती मेरी चोप्रा जोनससोबत सुंदर वेळ घालवते. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या मुलीसोबतचा एक खास फोटो शेअर करून, तिने चाहत्यांना सांगितलं की, ती तिच्या छोट्या परीसह बाहेर गेली होती. दरम्यान तिची एक खास मैत्रीणसुद्धा तिच्यासोबत होती. लग्नानंतर प्रियांका न्यूयॉर्कमध्येच वास्तव्यास आहे. तसेच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती तिच्या चाहत्यांना प्रत्येक अपडेट देत असते. अलीकडे, तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपली मुलगी मालती मेरी चोप्रा जोनस आणि आपली खास मैत्रीण तमन्ना दत्तासोबत हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये प्रियांका तिच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली आहे. त्याचबरोबर तमन्नाने आपल्या मुलालाही आपल्या मांडीवर घेतलं आहे. मात्र, अभिनेत्रीने मालतीच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी बनवून तिचा चेहरा लपवला आहे. या फोटोमध्ये या दोघी कुल मदर अतिशय स्टायलिश दिसून येत आहेत. वास्तविक अभिनेत्रीने आपल्या खास मैत्रिणीसाठी ही पोस्ट शेअर केली आहे. तमन्ना आणि प्रियांकाच्या मैत्रीला तब्बल 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने प्रियांकाने ही पोस्ट केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या