JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियकराच्या मृत्यूने कोसळली होती मिलिंद सोमणची बायको, लग्नासाठी असं मनवलं घरच्यांना

प्रियकराच्या मृत्यूने कोसळली होती मिलिंद सोमणची बायको, लग्नासाठी असं मनवलं घरच्यांना

जेव्हा आम्ही (milind soman ankita kunwar) लग्नाबद्दल माझ्या घरी सांगितलं तेव्हा साहजिकच त्यांनी विरोध केला. आई- वडिलांना आमच्यातील वयाच्या अंतराचीच काळजी होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जून- मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर यांच्या लग्नाला वर्ष उलटून गेलं. मिलिंद त्याच्याहून २६ वर्ष लहान मुलीशी लग्न करणार हे जेव्हा त्याच्या चाहत्यांना कळलं तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला होता. आपल्या नात्याला लग्नापर्यंत घेऊन जाण्याचा प्रवास दोघांसाठी सोपा नव्हता. नुकतंच अंकिताने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ साठी आपली लव्ह स्टोरी शेअर केली. यामध्ये अंकिताने तिच्या आई- वडिलांकडून लग्नासाठी कशी परवानगी मिळवली ते सांगितलं. बॉलिवूड अभिनेत्रीकडून शिवाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट, सोशल मीडियात खळबळ

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजसाठी अंकिता आणि मिलिंदने लिहिली. यात त्यांनी लिहिले की, ‘मी देश सोडून जाण्याचा विचार पक्का केला होता. हा तो काळ होता जेव्हा माझ्या प्रियकराचा अचानक मृत्यू झाला होता. मी फार नैराश्यग्रस्त होती आणि मला वाटत होतं की आता काही होऊ शकत नाही. काही महिन्यांनंतर माझं बदली चेन्नईमध्ये झाली.’ ‘जे मी भोगले ते यांना भोगायला लावू नका, मुलींना कधी डान्सर करू नका…’

जाहिरात

‘मी माझ्या सहकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये थांबली होती. एक दिवस मी मिलिंद सोमणला हॉटेलच्या लॉबीमध्ये पाहिले. मी त्याची फार मोठी चाहती होती. मी त्याला हॅलोही म्हटलं पण तो त्याच्या कामात फार व्यग्र होता. काही दिवसांनी आम्ही चेन्नईच्या एका नाइट क्लबमध्ये भेटलो. मी मिलिंदला पाहत होते आणि तो मला पाहत होता. माझ्या मित्रांनी मला त्याच्याशी जाऊन बोलायला सांगितलं. आम्ही बोललो आणि एकमेकांचा फोन नंबरही घेतला. लग्नाआधी आम्ही पाच वर्ष एकमेकांना डेट केलं.’ …म्हणून ‘भारत’साठी कतरिना कैफनं ‘स्ट्रीट डान्सर’ला केलं गुडबाय

जाहिरात

‘जेव्हा आम्ही लग्नाबद्दल माझ्या घरी सांगितलं तेव्हा साहजिकच त्यांनी विरोध केला. आई- वडिलांना आमच्यातील वयाच्या अंतराचीच काळजी होती. पण जेव्हा त्यांनी आम्हाला आनंदी पाहिलं तेव्हा त्यांनी लग्नाला होकार दिला. मी मिलिंदला माझ्या एक्स बॉयफ्रेंडबद्दलही सांगितलं होतं. मी त्याला म्हटलं की तो आजही माझ्या आयुष्याचा एक भाग आहे.’ अंकिताआधी मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच स्टार मेलेन जाम्पनोईशी लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. २००९ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. GQ 100 Best Dressed Awards- कतरिना कैफचा हॉट लुक पाहिलात का?

जाहिरात
जाहिरात

सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या