JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आता पद्म पुरस्कार येणार..', स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंवर शेलक्या शब्दात निशाणा

'आता पद्म पुरस्कार येणार..', स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंवर शेलक्या शब्दात निशाणा

विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (swara bhaskar) विक्रम गोखले यांच्यावर सोशल मीडियावर निशाणा साधला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 नोव्हेंबर- भारताला स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, तिच्या या विधानाचे ज्येष्ठ मराठी कलाकार विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांनी समर्थन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (swara bhaskar) विक्रम गोखले यांच्यावर सोशल मीडियावर निशाणा साधला आहे. स्वरा भास्करने एएनआयचं एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये विक्रम गोखले प्रसारमाध्यमांसमोर बसल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिने “ आता पद्म पुरस्कार येणार आहे” अशी कॅप्शन दिली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन विक्रम गोखले यांनी केल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी साहित्य मंडळाने (Marathi Sahitya Mandal) देखील विक्रम गोखलेंवर देशद्रोहा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

विक्रम गोखले नेमके काय म्हणाले होते? विक्रम गोखले (vikram gokhale) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने काल, पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करणात आला होता. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणावतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील पाठींबा दर्शवला. वाचा :  ‘मला जमिनीवर उतरवणारी..‘असं म्हणत समीर चौगुलेंची पत्नीसाठी खास पोस्ट यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होत. यावरून अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. वाचा :  मराठीतील दिग्गज खलनायकाच्या नातीचं मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण कंगना नेमकी काय म्हणाली होती? भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014मध्ये मिळाले, असं कंगना रणावत म्हणाली होती. त्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या व वादंग निर्माण झाला. आता कंगनाच्या या वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याने, नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या