JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sushmita Sen and Lalit Modi : सुष्मिता सेन आणि ललित मोदींचा ब्रेक-अप? यामुळे होतेय चर्चा

Sushmita Sen and Lalit Modi : सुष्मिता सेन आणि ललित मोदींचा ब्रेक-अप? यामुळे होतेय चर्चा

आयपीएल फाऊंडर आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांचं एक महिन्यातच ब्रेकअफ झाल्याचं म्हटलं जात आहे. काय आहे यामागचं कारण.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  05 सप्टेंबर :   काही दिवसांआधी ज्यांच्या रिलेशनशिपच्या बातमीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती ते म्हणजे अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी. पण नुकतीच दोघांचं नातं संपुष्टात आल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहे. रिलेशनशिपच्या चर्चा समोर आल्याच्या एका महिन्यातच दोघांचं ब्रेक अप झाल्याचं म्हटलं जात आहे. दोघांच्या वेगळं होण्याचं कारण सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याचं म्हटलं जात आहे. काय आहे सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या ब्रेकअपची भानगड जाणून घ्या. ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रोफाइलवरुन सुश्मिता सेनचं नाव काढून टाकलं आहे.  यावरुन दोघांचा ब्रेकअप झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.  दोघांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर  बदल केल्याचं दिसून आलं आहे. दोघांचे प्रोफाइल फोटो देखील बदलण्यात आले आहेत. सुष्मिता आणि ललित मोदी यांनी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अजून कोणताही खुलासा केलेला नाही.  तसंच याबाबत दोघांनी कोणती पोस्टही केलेली नाही. ललित मोदींचा आधीचा प्रोफाइल

जवळपास एक महिनाआधी ललित मोदी यांनी दोघांचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. आता मोदींनी त्यांच्या प्रोफाइल आणि इन्स्टाग्राम बायोमधून सुष्मिताचा फोटो आणि नाव काढून टाकलं आहे. नवीन प्रोमफाइलमध्ये ललित मोदी हसताना दिसत आहेत. तर त्यांच्यामागे आयपीएलचं बॅकग्राऊंड दिसत आहे. तर इन्स्टाग्राम बायोमध्येही केवळ आयपीएल फाऊंडर असं दिसत आहे.  माय लव्ह सुष्मिता हे काढून टाकल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ललित मोदींचा आत्ताचा प्रोफाइल

ललित मोदींनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये केलेल्या या बदलांनंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे.  ब्रेकअपच्या चर्चांनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे सुष्मिताच्या एक्स बॉयफ्रेंडची ही चर्चा रंगली आहे. दोघांच्या ब्रेअअपचं कारण तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या