JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘कदाचित देवाला... ’ श्रुती हसनच्या बॉयफ्रेंडने भावुक पोस्ट लिहित तोडलं नातं

‘कदाचित देवाला... ’ श्रुती हसनच्या बॉयफ्रेंडने भावुक पोस्ट लिहित तोडलं नातं

मायकल आणि श्रुती गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. भारतात अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहण्यात आले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, २७ एप्रिल- अभिनेत्री श्रुती हसन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती इटालियन प्रियकर मायकल कार्लोससोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत होती. पण आता श्रुतीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. श्रुती आणि मायकलचं ब्रेकअप झालं असून दोघांनी आयुष्यात एकटंच पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ३० वर्ष हा अभिनेता लढतोय एड्सची लढाई, कधीही होऊ शकतो मृत्यू मायकल कार्लोसने ट्वीट करत म्हटलं की, ‘देवाला कदाचित हे मान्य नव्हतं. त्यामुळे आम्हाला वेगळं व्हावं लागलं. पण ही तरुणी नेहमीच माझी मैत्रीण राहील.’ मायकलच्या या पोस्टवरून श्रुतीच्या चाहत्यांना कळलं की त्या दोघांचं ब्रेकअप झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार दोघांनीही समजूतदारपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकीकडे लग्नापर्यंत गोष्टी गेल्या असताना अचानक ब्रेकअप का झालं असाच प्रश्न आता त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

‘एकदा तरी तिने मला कॉल करायचा होता…’ जेव्हा दीपिका पदुकोणने रणबीरला म्हटलं होतं विश्वासघाती, त्याने दिली होती ही प्रतिक्रिया अजूनपर्यंत त्यांच्या ब्रेकअपचं कारण समोर आलेलं नाही. मायकलच्या पोस्टवर श्रुतीची सर्वात जवळची मैत्रीणसत्यालक्ष्मीनेही कमेंट केली आहे. सत्यालक्ष्मीने लिहिले की, ‘तू नेहमीच माझा चांगला भाऊ राहशील. खूप सारं प्रेम.. देव तुला नेहमी आनंदी ठेवो. आईकडूनही तुला खूप सारं प्रेम.’

संबंधित बातम्या

…म्हणून एवेंजर्स सिनेमा संपण्याच्याआधीच थिएटरमधून बाहेर पडले सुशांत सिंग राजपूत मायकल आणि श्रुती गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. भारतात अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. असं म्हटलं जातं की, श्रुती आणि मायकलची ओळख एका मित्राच्या मध्यस्तीने लंडनमध्ये झाली होती. करिअरबद्दल बोलायचे झाले तर मायकल हा एक ब्रिटीश थिएटर आर्टिस्ट आहे. तो लंडनमधील डीप डायविंग मॅन या थिएटर ग्रुपसोबत काम करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या