JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: प्रियांका चोप्राने परदेशात साजरी केली रंगपंचमी, विदेशी कुटुंबाला दिला देसी तडका

VIDEO: प्रियांका चोप्राने परदेशात साजरी केली रंगपंचमी, विदेशी कुटुंबाला दिला देसी तडका

प्रियांकाने आपल्या पती आणि मित्रपरिवारासोबत परदेशात रंगपंचमी साजरी केली आहे. अभिनेत्रीने या सुंदर क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मार्च-   देशभरात सध्या होळी-रंगपंचमीची   (Holi 2022)  धूम सुरु आहे. भारतीय लोक परदेशातसुद्धा या सणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. यामध्ये बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री प्रियांका चोप्राचासुद्धा   (Priyanka Chopra)   समावेश आहे. प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये   (Hollywood)  सक्रिय आहे. अभिनेत्रीने आपल्या पती आणि मित्रपरिवारासोबत परदेशात रंगपंचमी साजरी केली आहे. अभिनेत्रीने या सुंदर क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री सर्वांसोबत रंगपंचमी खेळताना दिसणं येत आहे. प्रियंकाने शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये अभिनेत्रीसह सर्वचजण रंगात न्हाऊन निघाले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये प्रियांका पती निक जोनससोबत मजामस्ती करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका आणि निक एकेमकांना रंग लावताना दिसत आहेत. शिवाय दोघेही रोमँटिक होत एकेमकांना लीप-लॉकसुद्धा करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

अभिनेत्रीने शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती आपल्या विदेशी मैत्रिणींसोबत रंगांची उधळण करत मजेशीर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीने याशिवाय काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रींचे सासरचे लोक आणि विदेशी मित्र-मैत्रिणी दिसून येत आहेत.. या सर्वांनी प्रियांकासोबत रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेतलेला दिसून येत आहे.प्रियांकाने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘‘जेव्हा जग काळजीयुक्त असतं, अशा वेळी थोडासा आनंद मिळणं हा एक आशीर्वादच आहे. सर्वांना होळीच्या शुभेच्छा. देसी डूड सारखी होळी खेळल्याबद्दल आमच्या मित्रांचे आणि कुटुंबाचे आभार!’’ प्रियांका चोप्राचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टला 3 लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. (हे वाचा: HOLI 2022: ‘या’ बॉलिवूड सेलेब्रेटींना वाटते रंगांची भीती, होळीपासून राहतात दूर ) प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. नुकतंच ती ‘द मॅट्रिक्स’ मध्ये झळकली होती. प्रियांका चोप्रा आपल्या पतीसोबत लॉस अँजेल्स, कॅलिफोर्नियामध्ये राहते. प्रियांका चोप्राने 1 डिसेंबर 2018 मध्ये हॉलिवूड गायक आणि अभिनेता निक जोनससोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांनतर ती परदेशातच वास्तव्यास आहे. प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. नुकतंच प्रियांका आणि निकने सरोगेसीद्वारे एका लेकीला जन्म दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या