JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री पायल घोषने व्यक्त केली तिच्या हत्येची शंका, म्हणाली- मी छताला लटकलेली आढळले तर...

अभिनेत्री पायल घोषने व्यक्त केली तिच्या हत्येची शंका, म्हणाली- मी छताला लटकलेली आढळले तर...

अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) आणखी एक धक्कादायक पोस्ट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) वर अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिने एक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनुरागवर आरोप करत तिच्या सुरक्षेबाबत देखील शंका उपस्थित केली आहे. या पोस्टमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील मदत मागितली होती. यानंतर सोशल मीडियावर आणि बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली. पायल घोषला काहींनी समर्थन केले तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी अनुरागच्या बाजुने त्यांची मत सोशल मीडियावर व्यक्त केली. अगदी अनुरागच्या पूर्वपत्नींनी देखील त्याला पाठिंबा दिला. दरम्यान अनुराग विरोधात केस दाखल केल्यानंतर आता पायलने आणखी एक धक्कादायक पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर पायलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘मिस्टर अनुराग कश्यप यांच्या विरोधात मी एका प्रसिद्ध पोर्टलला या घटनेसंदर्भात मुलाखत दिली होती आणि मला असे माहित झाले की यासाठी स्वत: अनुराग कश्यपची मला परवानगी घ्यायला हवी होती. इंडिया, मी जर छताला लटकलेली सापडले तर लक्षात ठेवा. मी आत्महत्या केली नसेन. त्यांच्याकडे नैराश्य आणि मेडिकेशनची कहाणी तयार आहे.’ अशी पोस्ट करताना तिने #NotGoingDown #MeToo हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत.

पायलच्या या पोस्टवर खूप कमेंट्स येत आहेत. तिची ही पोस्ट व्हायरल देखील होत आहे. तिने या पोस्टमधून तिच्या हत्येबाबत शंका उपस्थित केली आहे. (हे वाचा- दीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह? परवानगीसाठी NCBकडे केला अर्ज) (हे वाचा- पुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल ) अभिनेत्री पायल घोषने वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये अनुराग कश्यप विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने गंभीर आरोप करत अनुरागविरोधात भादवी कलम 376, 354, 341, 342 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तिने असा आरोप केला होता की दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिच्याबरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या