JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Malaika Arora च्या सिझलिंग फोटोवर चाहते फिदा; अर्जुन म्हणतो, 'वीकेंड प्लॅन काय आहे?'

Malaika Arora च्या सिझलिंग फोटोवर चाहते फिदा; अर्जुन म्हणतो, 'वीकेंड प्लॅन काय आहे?'

लाल रंगाच्या रॉयल लेहंग्यानंतर मलायकाने क्रीम गोल्डन ड्रेसमध्ये काही फोटो शेअर करून सोशल मीडियावर नुसता राडा म्हणजे धुमाकुळ घातला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने नवख्या अभिनेत्रींना देखील मागे टाकले आहे. मलायाकने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत . या फोटोमध्ये मलायकाच्या अदावर चाहते फिदा झाले आहेत. लाल रंगाच्या रॉयल लेहंग्यानंतर मलायकाने क्रीम गोल्डन ड्रेसमध्ये काही फोटो शेअर करून सोशल मीडियावर नुसता राडा म्हणजे धुमाकुळ घातला आहे. मलायकाने विविध पोझमध्ये तिचे काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. या गोल्डन क्रीम कर्लरच्या ड्रेसध्ये मलायकाच्या अदा या घायाळ करत आहेत. तिचा हा स्टाईलिश अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने तर म्हटलं आहे की, देवा मला अर्जुन कपूर बनवं.

मलायका अरोराने यापूर्वी लाल रंगाच्या लेहंगामध्ये आपला रॉयल अंदाज दाखवला होता. मलायका अरोराने लाल रंगाचा एकदम भरदार लेहंगा परिधान केला होता. या ट्रॅडिशनल लूकमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत होती. आता मलायकाच्या या सुंदर फोटोनंतर अर्जुन कपूरचे शर्टलेस फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुनने आपला शर्टलेस जिम करतानाचा एक फोटो शेअर करत विचारले आहे की, ‘वीकेंड प्लॅन काय आहे? यापुढे अर्जुनने लिहिले आहे की… ‘हार्डवर्क हार्डवर्क प आणि खूप हार्डवर्क म्हणजे मेहनत.. .. मेहनतचे फळ शेवटी सगळ्यांना तर दाखवावे लागते’. अर्जुनचा फिटनेस पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

मलायका आणि अर्जुन कपूर नेहमी त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. मलयाका नेहमी सोशल मीडियावर नेहमी फॅशन सेन्स, फिटनेस कधी कपड्यावरून तर कधी चालण्यावरून चर्चेत असते. पापाराझींची ती आवडती आहे. जिमपासून ते लंच-डिनरपर्यंत, पापाराझी मलायकाला फॉलो करत असतात. तिची प्रत्येक लुक कॅमेरात कैद करत असतात. वाचा : ‘ह्या बयाकडे दुसरे कपडे नाहीत का?’ ; Malaika Arora पुन्हा ड्रेसिंग स्टाईलवरून ट्रोल नेटकरी बऱ्याचवेळा मलायकाच्या लुकची तर कधी तिच्या फिटनेस आणि फिगरची प्रशंसा करताना दिसतात. कधी कधी तिला यावरून ट्रोल देखील केले जाते. काही दिवसांपूर्वीही ती तिच्या चालण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल झाली होती.. यानंतर नुकतीच मलायका अरोरा तिच्या जिम आउटफिट आणि वॉकिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या