विकी कौशल
मुंबई, 28 नोव्हेंबर : बॉलिवूड मधील आघाडीचा अभिनेता विकी कौशल सतत चर्चेत असतो. विकीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. विकीने ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण केलं होतं. त्याचा हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याने एकापेक्षा एक चांगले चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आता तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत येतो. विकी सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर त्याच्या बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या लहानपणीचा आहे. यामध्ये तो डान्स करताना पहायला मिळत आहे. फोटो शेअर करत विकीने लिहिले, आयुष्यात बॅग्राउंडला डान्स करण्याचा खूप अनुभव आहे. त्याने शेअर केलेला हा थ्रोबॅक फोटो 1996 चा आहे. त्याने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. हा फोटो शेअर करताना त्याने ‘गोविंदा नाम मेरा’ असा हॅशटॅगही दिला आहे.
विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो बॅग्राउंड डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाती चांगलीच चर्चा आहे. चित्रपटातील पहिलं गाणं ‘बिजली बिजली’ नुकतंच प्रदर्शित झालं. हे गाणं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यामधील कियारा आणि विकीचा हटके अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्यातं प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुकही होत आहे.
दरम्यान, विकी कौशलसोबत ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 16 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल खूप डान्स करताना दिसणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.