मुंबई, 26 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. सुझैन खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक पुन्हा प्रेमात पडला आहे का? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. कारण सध्या तो त्याची लेडीलव्ह सबा आझादसोबतच्या (Saba Azad) नात्याबद्दल चर्चेत आहे. पापाराझींनी या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र डिनर डेटवर पाहिलं आहे. नुकतीच सबा हृतिकच्या कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसली होती. त्यानंतर या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे. परंतु या दोघांनी अजूनही आपल्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीय. दरम्यान हृतिकने आपल्या सोशल मीडियावर सबासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता हृतिक रोशन फारच ऍक्टिव्ह अभिनेता आहे. तो इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. हृतिक रोशनने यावेळी केलेली पोस्ट थोडी खास आहे. कारण ही पोस्ट अभिनेत्याने त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड सबा आझादसाठी केलेली आहे. जी सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सबा आझाद आणि अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह यांचा फोटो शेअर केला आहे. जो तिच्या मॅडबॉय/मिंक कि बँडचा आहे. हा एक इलेक्ट्रो-फंक बँड आहे. यामध्ये सबा आणि इमाद यांचाही समावेश आहे. दोघेही आपल्या बँडसोबत पुण्यात येत आहेत. अर्थातच पुण्यामध्ये त्यांचा शो होणार आहे. हृतिक आपल्या चाहत्यांना ही माहिती देत आहे. तसेच या फोटोसोबत हृतिकने लिहिले आहे, ‘किल इट गाईज.’ (हे वाचा:
विदेशातही Prabhasच्या ‘राधे श्याम’ची धूम, रिलीजपूर्वीच 90 टक्के तिकिटांची विक्री
) या पोस्टनंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू केली आहे. सध्या दोघेही मौन बाळगून आहेत परंतु सोशल मीडियावर त्यांच्या हालचाली पाहून, या दोघांमध्ये नक्क्कीच काहीतरी शिजत असल्याचं चाहत्यांचं ठाम मत आहे. हे दोघेही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सर्व प्रथम हे दोघेही एका डिनर डेटवरून येताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यांनतर या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती.