JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / एकदम झकास! Anil Kapoor च्या फॉरेन व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्ही पाहिलात का?

एकदम झकास! Anil Kapoor च्या फॉरेन व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्ही पाहिलात का?

बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांचे डुप्लिकेट आपल्याला नेहमीच पहायला मिळतात. कलाकारांचे डुप्लिकेट इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले आहेत. अशातच डुप्लिकेट कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांचे डुप्लिकेट आपल्याला नेहमीच पहायला मिळतात. कलाकारांचे डुप्लिकेट इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले आहेत. अशातच डुप्लिकेट कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव दुसरं तिसरं कोणतं नसून बॉलिवूडचे फॉरेव्हर यंग म्हणून ओळखले जाणारे अनिल कपूर आहेत. अनिल कपूरच्या डुप्लिकेटने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अनिल कपूर सारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला पाहून अनिलचे चाहते थक्क झाले आहेत. अनिल कपूरसारखी दिसणारी दुसरी व्यक्ती अमेरिकेतील आहे. अनिल कपूरसारखा दिसणारा जॉन अफर अमेरिकेत फिटनेस प्रशिक्षक आहे. जॉन अफरने नुकताच त्याच्या इन्स्टागामवर त्याचा आणि अनिल कपूरचा कोलाज केलेला एक फोटो शेअर केला. यामध्ये एकीकडे जॉन एफर बॉडी फ्लॉंट करताना मिरर सेल्फी घेत आहे. तर दुसरीकडे अनिल कपूरचा जुना फोटो आहे. हा कोलाज शेअर होताच व्हायरल झाला आणि लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या

जॉन अफर अनिल कपूरच्या तरुणपणीसारखा दिसत आहे. फोटो शेअर करत जॉनने लिहिलं की, मी बॉलीवूडमधील स्टार अभिनेते अनिल कपूर यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. जॉननं त्याचा फोटोमधे अनिल कपूर यांना टॅगही केला आहे. सध्या या पोस्टवर भरभरुन कमेंट येताना दिसतायेत. ‘अमेरिकेतील अनिल कपूर, तू लवकरच बॉलिवूडमध्ये असशील, मला खरंच वाटलं अनिल कपूर आहे’, अशा प्रकारच्या अनेक कमेंट या व्हायरल पोस्टवर येत आहे. हेही वाचा -  Rana Daggubati : सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर भडकला राणा दग्गुबती; अभिनेत्याच्या त्या कृत्याची होतेय चर्चा दरम्यान, अनिल कपूर रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ते हृतिक रोशनच्या ‘फायटर’ या चित्रपटातही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या