JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: झेंडूच्या फुलांपासून बनवली बिकिनी; उर्फी जावेदचा नवा हाॅट लूक व्हायरल

VIDEO: झेंडूच्या फुलांपासून बनवली बिकिनी; उर्फी जावेदचा नवा हाॅट लूक व्हायरल

उर्फी जावेद आगळ्या वेगळ्या फॅशननं नेटकऱ्यांना नेहमीच आश्चर्याचा धक्का देते. अशातच उर्फीचा आणखी एक नवा लूक व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : बिग बाॅसमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfii Javed New Look). उर्फी जावेद नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशननं नेटकऱ्यांना नेहमीच आश्चर्याचा धक्का देते. नवनवीन कपडे, अफलातून लूकनं ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. उर्फीचा नेहमीच आपल्याला एक निराळा अंदाज पहायला मिळतो. अशातच उर्फीचा आणखी एक नवा लूक व्हायरल होत आहे. नेहमीच फॅशनच्या नावावर काहीतरी वेगळे करून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी उर्फी आज नव्या पेहराव्यात पहायला मिळाली. उर्फीनं तिच्या नव्या लूकचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तीनं झेंडूच्या फुलांची बिकीनी घातलेली दिसत आहे. उर्फी जावेद कॅमेऱ्यासमोर तिची नवीन बिकिनी स्टाईल दाखवताना दिसतेय. लुकबद्दल बोलायचे झाले तर, उर्फीनं खुल्या केसांसह हलका मेकअप केला आहे.

उर्फीचा नवा लूक आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया येताना दिसत आहे. युजरने कमेंट केली - ‘लोकांकडे दुर्लक्ष करून बोल्ड लूक देणे हे एक मोठे धाडस आहे. अजून एक यूजर म्हणाला की, तुझ्या आत्मिश्वासाला सलाम.

दरम्यान, उर्फी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली पहायला मिळते. तिचा बेधडकपण, तिची अतरंगी फॅशन नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. अनेकवेळा तिला कपड्यांवरुन ट्रोलही करण्यात येतं. मात्र ती ट्रोल आणि शिवगाळ करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या