सलमान खान
मुंबई, 17 जुलै : बिग बॉस ओटीटी 2 हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. स्पर्धकांमधील राडे, भांडण आणि मैत्री सगळंच चर्चेत असतं. बिग बॉस ओटीटी 2 सुरु होण्याआधी या शोचं सूत्रसंचालन कोण करणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. यासाठी रणवीर सिंग ते करण जोहर पर्यंत अनेक नावं समोर आली होती. पण अखेर या शोची धुरा देखील सलमानच्या हातात आली. सलमान खानच या शोचं सूत्रसंचालन करत आहे. दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेण्यापासून त्यांचं कौतुक करण्यापर्यंत सलमान खान सगळं करत असतो. मात्र आता तो या शो मधून एक्झिट घेणार असल्याची चर्चा आहे. याचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय आहे यामागचं कारण जाणुन घ्या. लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चं सध्या ओटीटी पर्व जोरदार सुरू आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली लोकप्रियता पाहून हे पर्व आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शो मध्ये सलमानच्या अनुपस्थितीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. गेल्या आठवड्यात सलमान खानच्या जागी कृष्णा अभिषेकने शोची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर सलमान खानने हा शो सोडला असल्याची चर्चा आहे. यामागचं कारण म्हणजे सलमानचं सिगारेट प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटीच्या सेटवरून सलमान खानचा हातात सिगारेट घेतलेला एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. क्रिएटिव्ह टीमच्या या निष्काळजीपणामुळे सलमान खान त्यांच्यावर चांगलाच चिडला, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. इतकेच नाही तर बिग बॉस ओटीटी 2 सोबतच सलमान खानने यापुढे टीव्ही सीझनही होस्ट करू नये, असेही सांगण्यात आले. त्यामुळेच आता बिग बॉस मध्ये सलमान दिसणार नसल्याची तुफान चर्चा सुरु झाली आहे. ‘माझ्या आयुष्याला ग्रहण…’ राखी सावंतला जवळच्याच व्यक्तीनं दिला धोका; ड्रामा क्वीनचा मोठा खुलासा पण अलीकडेच बिग बॉसचे अपडेट देणाऱ्या ; ‘द खबरी’ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, सलमान खानने हा शो सोडलेला नाही आणि तो अजूनही रिअॅलिटी शोचा एक भाग आहे आणि लवकरच तो पुन्हा शोमध्ये दिसणार आहे अशीही माहिती शेअर करत चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. बिग बॉस ओटीटीच्या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानच्या हातात प्रेक्षकांनी सिगारेट पाहिली होती. त्यानंतर त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. याच कारणामुळे सलमान ट्रॉलर्सच्या निशाण्यावर होता. तर काही चाहत्यांनी भाईजानला पाठिंबा देत सिगारेट ओढण्यास काय चुकीचे आहे असं म्हटलं होतं. बिग बॉस ओटीटी 45 दिवसात संपणार होता, परंतु निर्मात्यांना चॅनलकडून दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे. सलमान खानचा शो सुरू होऊन चार आठवडे झाले आहेत आणि अजूनही घरात 10 स्पर्धक शिल्लक आहेत. गेल्या वीकेंडच्या युद्धात शोमध्ये कोणतेही एलिमिनेट झाले नाही. आता या पर्वाच विजेतेपद कोण जिंकतं हे पाहणंही महत्वाचं आहे.