मुंबई, 4 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो अशी ‘बिग बॉस’ची ओळख आहे. ‘बिग बॉस मराठी’लासुद्धा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच हा शो टीआरपी रेसमधील दमदार शो समजला जातो. प्रेक्षकांना आता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीजनची ओढ लागली आहे. परंतु या सीजनसाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. पाहूया काय आहे लेटेस्ट रिपोर्ट. ‘बिग बॉस मराठी’ या शोची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. याठिकाणी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे राडे, मैत्री, प्रेम आणि टास्कमुळे शोची रंगत आणखीनच वाढते. आपल्या लाडक्या कलाकारांना या घरात पाहण्यासाठी चाहते उसुक असतात. बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन तुफान लोकप्रिय ठरला होता. हा सीजन संपल्यापासूनच प्रेक्षकांना चौथ्या सीजनची प्रतीक्षा लागून होती. काही दिवसांपूर्वी या शोचा प्रोमोसुद्धा रिलीज झाला होता. त्यावरुन दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संभाळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. टाइम्स नाऊ मराठीच्या रिपोर्टनुसार, येत्या 11 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीजन लॉन्च होणार होता. परंतु समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, निर्मात्यांनी या शोचं लॉन्चिंग पुढं ढकलल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या बिझी शेड्युलमुळे हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. **(हे वाचा:** ‘हा खूप पर्सनल प्रश्न आहे’; ‘ती’ कमेंट करणाऱ्या महिलेवर भडकली Hemangi Kavi ) तसेच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी अजूनही नक्की झालेली नाहीय. या शोसाठी मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. मात्र काही कलाकार अद्यापही शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचार करत आहेत. त्यामुळे स्पर्धकांची यादी फायनल झालेली नाहीय. अशातच आता शो पुन्हा लांबणीवर पडणार हे ऐकून चाहते निराश होत आहेत.