JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 4: 'या' दिवशी सुरू होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन; कोण असणार स्पर्धक?

Bigg Boss Marathi 4: 'या' दिवशी सुरू होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन; कोण असणार स्पर्धक?

टेलिव्हिजनवरील हाय टिआरपी मिळवणारा सर्वांचा लाडका रिअँलिटी शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस मराठी 4 सुरू होण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  24 ऑगस्ट: टेलिव्हिजनवरील सर्वांत ग्लॅमरस शो म्हणून ओळखला जाणाऱ्या बिग बॉसनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हिंदी नंतर मराठीमध्येही बिग बॉस सुरू झालं. बिग बॉस मराठीच्या 3 यशस्वी सीझननंतर बिग बॉस मराठी 4 प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉस मराठीमध्ये सुत्रसंचालन कोण करणार यावरुन खूप चर्चा रंगल्या होत्या. महेश मांजरेकरांनी पहिल्या तिन्ही सीझनचं सूत्रसंचालन केलं होतं. मात्र चौथ्या सीझनबाबत मांजरेकर देखील ठोसपण काही सांगत नव्हते. अशातच बिग बॉसचा ऑफिशिअल प्रोमो प्रदर्शित झाला आणि महेश मांजरेकरच चौथ्या सीझनचं सूत्रसंचानल करणार यावर शिक्का मोर्तब झाला.  सूत्रसंचालक ठरला. घरातील संभाव्य स्पर्धकांची नावं देखील समोर आली पण प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेला बिग बॉसचा चौथा सीझन नक्की कधी सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वच आतूर आहेत. बिग बॉस मराठी हा शो महाराष्ट्राच्या घराघरात पाहिला जातो. मनोरंजन, राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या खेळात एकत्र येतात. 100 दिवस एकाच घरात राहून हे स्पर्धक कधी एकमेकांची काळजी घेतात तर कधी एकमेकांचा जीव देखील घ्यायला निघतात. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कधी सुरू होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. वाचा बिग बॉस मराठी 4 मधील संभाव्य स्पर्धकांची यादी  - Big Boss Marathi 4: ‘हे’ आघाडीचे कलाकार असणार बिग बॉस मराठीचा भाग? अनेक नावांची होतेय चर्चा

संबंधित बातम्या

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कधी येणार यासाठी कोणत्याही सूत्रांची गरज नाही. कलर्स मराठीवरील काही कार्यक्रमांचा नीट विचार केला तर बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कधी सुरू होईल हे आपल्या लक्षात येईल.  कलर्स मराठीवर सध्या ‘सुर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम सध्या अंतिम टप्प्यात आला असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच दुसरा कार्यक्रम सुरू होणार आहे. साधारण 25 सप्टेंबरला बिग बॉस मराठी सुरू होण्याची शक्यता आहे.  कारण शनिवार 24 सप्टेंबरला सुर नवा ध्यास नवा संपलं तर लगेच दुसऱ्या दिवशी बिग बॉस मराठी सुरू होण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी 4 हे 25 सप्टेंबरला सुरू होईल ही तारीख जवळपास 90 टक्के कन्फर्म झाली आहे असं म्हटलं जात आहे.  पण यात काही बदल देखील होऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या