JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बिग बॉस फेम अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार, कारची काच फोडून चोरट्याने केली बॅग पसार

बिग बॉस फेम अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार, कारची काच फोडून चोरट्याने केली बॅग पसार

बिग बॉस फेम अभिनेत्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याच्या कारची काच फोडून एका चोरट्याने त्याची महागडी बॅग लंपास केल्याचे समोर आले आहे.

जाहिरात

बिग बॉस फेम अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई11 जुलै- ‘बिग बॉस मराठी 3’ चा उपविजेता जय दुधाणे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. जय दुधाणेसोबत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याच्या कारमधून बॅग चोरील गेल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत अभिनेत्याने याबद्दल माहिती दिली आहे. जय दुधाणेची बॅग त्याच्या कारमधून चोरीला गेली आहे. ही घटना सोमवारी (10 जुलै) रात्री घडली. चोरट्यांनी कारची काच फोडून त्याची बॅग चोरली. जयने घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीला फोटो शेअर केला होता. यात जयच्या गाडीची काच फुटल्याचं दिसतं आहे. मित्रांनो मी ठीक आहे. कोणीतरी माझ्या गाडीची काच फोडून बॅगची चोरी केली आहे. तुमची गाडी पार्क करताना काळजी घ्या, असं जय दुधाणेने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

एमटीव्हीवरच्या स्प्लिट्सव्हिला या रिअॅलिटी शोच्या तेराव्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला. देखणा आणि उत्तम शरीरयष्टी असलेल्या या अभिनेत्यानं बिगबॉसच्या अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवलं.

संबंधित बातम्या

जयने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी’मुळे त्याच्या लोकप्रियतेत भर पडली. जय लवकरच महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या