राखी सावंत
मुंबई, 23 डिसेंबर : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन निरोप घेण्याच्या दिशेनं प्रवास करत आहे. पुढच्या 20 दिवसात बिग बॉस मराठी 4चा विजेता घोषित होईल. दरम्यान शेवटचे दोन आठवडे शिल्लक असताना सदस्यांना 80 दिवसांनी अखेर त्यांच्या कुटुंबियांना भेटायला मिळणार आहे. बिग बॉसचा हा आठवडा फॅमिली विक सुरू आहे. घरात आता असलेल्या सदस्यांना त्यांच्या जवळची कुटुंबातील माणसं भेटायला येतात. इकते दिवस ढळलेला आत्मविश्वास त्यांना या आठवड्यात परत मिळतो. पण फॅमिली विकमध्ये आतापर्यंत एका स्पर्धकाला कोणीच भेटायला आलं नाही. ती स्पर्धक म्हणजे राखी सावंत . तब्बल 80 दिवसांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटल्यानं खेळण्याची नवी ऊर्जा मिळते. फॅमिली विकमुळे घराबाहेरील परिस्थिती कळते. मात्र या सगळ्याला एक सदस्य कायम वंचित राहिला आहे ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. राखीनं आजवर बिग बॉसचे बरेच सीझन केलेत. ती स्पर्धक म्हणून आत जाते. फॅमिली विक पर्यंत येते. मात्र आतापर्यंत तिनं केलेल्या बिग बॉसमध्ये एकदाही फॅमिली विकमध्ये तिचे कुटुंबिय तिला भेटायला आले नाहीत हिच खंत राखीनं बिग बॉस मराठीमध्ये बालून दाखवली होती. पण आता बिग बॉस मराठीमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात राखीला भेटायला तिचा बॉयफ्रेंड आदिल येणार आहे. हेही वाचा - Hruta Durgule : हृताच्या ट्रिप थांबेना! थायलँडनंतर नवरा बायको पुन्हा निघाले एकत्र राखी इतर वेळी लोकांचे मनोरंजन करत असेल, पण फॅमिली वीकमध्ये कोणीच भेटायला न आल्यानं घरात ती खूप निराश आणि उदास वाटत होती. हे पाहून बिग बॉसने तिला एक खास सरप्राईज दिले. बिग बॉसच्या घरात तिचा प्रियकर आदिल दुर्राणीला एंट्री दिली. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. त्यात राखी निराश झालेली आहे तेवढ्यात आदिल घरात येतो. त्याला घरात पाहून राखी खूप आनंदी असल्याचे दिसून आले. ती आनंदाने उडी मारते. इतकंच नाही तर ती आदिलची घरच्यांशी ओळख करून देते.
एवढंच नाही अदिलने राखीला गुडघ्यावर बसून खास मराठीत प्रपोज देखील केलेलं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. यामुळे राखी चांगलीच खुश झाली आहे.
राखी सावंतने बिग बॉसच्या अनेक सीझनमध्ये भाग घेतला आहे. ‘बिग बॉस 14’ मध्ये ती वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आली होती. त्यानंतर तिचा कथित पती रितेश कुमारही घरात आला. दोघांच्या लव्ह अँगलने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. मात्र, शोमधून बाहेर पडल्यानंतर दोघे वेगळे झाले आणि वादात सापडले. त्यानंतर राखी आदिलला भेटली आणि दोघेही आता खूप आनंदी आहेत.