JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 3:'ती फक्त क्युट बबली दिसते पण प्रत्यक्षात गुपचूप...' मीराने केली स्नेहाची चुगली; पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 3:'ती फक्त क्युट बबली दिसते पण प्रत्यक्षात गुपचूप...' मीराने केली स्नेहाची चुगली; पाहा VIDEO

मीरा आणि गायत्री आज स्नेहाविषयी बोलताना दिसणार आहेत. ‘स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली.’ असं सांगून मीरा काय काय बोलतेय पाहा..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 सप्टेंबर 2021 ;  बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3 ) घरामध्ये प्रत्येक दिवशी नाती बदलतात. कधी मैत्री होते तर कधी त्याच व्यक्तीशी भांडण देखील होतं. कधी वैर तर कधी त्याच व्यक्तीशी जुळवून घ्यावे लागते. जोड्या दर आठवड्यात बदलताना देखील दिसतात. पहिल्या आठवड्यात अशीच जोडी दिसून आली ती म्हणजे मीरा (Meera Jagannth) आणि गायत्री (Gayatri Datar ). यामुळे गायत्रीला महेश मांजरेकर यांनी सुनावले. मीराच्या मागे मागे करण्यात गायत्रीचा वैयक्तिक खेळ कुठेतरी मागे पडतो आहे. मीरा आणि गायत्री आज स्नेहा विषयी बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये मीरा गायत्रीला म्हणाली, स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली. ती गुपचुपमध्ये कीडे करते आणि मग शांत बसते, क्युट बबली दिसते. आणि म्हणूनच मी तिथे बोलले की मी इथे काही क्युट बबली बनायला आले नाही आहे. वाचा : नव्या आठवड्यात नवा खेळ, Bigg Boss च्या घरात रंगणार ‘जोडी की बेडी’चा भन्नाट टास्क गायत्री म्हणाली, स्नेहा मानत नाही तिने असं काही केले. मी स्नेहाशी बोलायला गेले. ती म्हणाली, म्हणजे मी काय करू ? मी तिला म्हणाले माझं तुला सांगण आहे की, मला तू आवडतेस, तू गोड आहेस. आपलं रिलेशन जर चांगलं रहायला हवं असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोल. सुरेखा ताईंना देखील तसंच वाटलं होतं, आम्ही सगळे बसलो होतो त्यांनी मला सांगितले आम्ही सगळ्यांनी ते क्लिअर केलं. स्नेहा माझ्याशी आधी बोलली असतं असं काही आणि मी तिला उडवाउडवीची उत्तरं दिली असती तर ठीक होतं मग तू मुद्दा काढलास सरांसमोर. मुळात स्नेहाने तो मुद्दा काढायलाच नको. तिच्या तोंडातुन दोन शब्द नाही निघत कधी, आज पहिल्यांदा मी तिचा आवाज इतका ऐकला असल्याचे सांगितलं.

संबंधित बातम्या

आता हा मुद्दा अजून किती ताणला गेला ? पुढे अजून काय काय झालं ? हे आजच्या भागामध्ये पाहण्यास मिळणार आहे. त्यासाठी बिग बॉस मराठीचा आजचा भाग नक्की पाहण्यास विसरू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या