मुंबई, 26 डिसेंबर- बिग बॉस मराठी सीजन तीनचा (bigg boss marathi 3 )आज फिनाले आहे. आज टॉप पाईव्हमधून मीनल शहा पहिली घराबाहेर पडली आहे. आणि बिग बॉस मराठीला त्यांचे शेवटचे टॉप चार मिळाले आहेत. यातून बिग बॉसला शेवटचे तीन मिळणार आहेत. आणि बिग बॉसला यातूनच त्याचा विजेता मिळणार आहे. खऱ्या अर्थाने यंदाच्या सीजनमध्ये बिग बॉसमध्ये फक्त बिग बॉईजची धमाल पाहण्यास मिळणार आहे. आणि आता यातून शेवटच्या चारमध्ये उत्कर्ष शिंदे घऱाबाहेर पडला आहे. आता विशाल निकम, विकास पाटील आणि जय दुधाणे यापैकी एक बिग बॉसचा विजेता होणार आहे. बिग बॉस मराठी सीजन आज संपेल मात्र प्रेक्षक नक्कीच या शोला मिस करतील कारण गेली कित्येक दिवस हे सगळे स्पर्धक सर्वांचे मनोरंजन करत आहेत. यंदाचा सीजन सुपरहिट ठरला आहे. आता विजेता मिळण्यासाठी काही तासच वाट पाहावी लागणार आहे. काही वेळात या सीजनाच विजेता मिळेल व सगळीकडे एकच जल्लोष पाहायला मिळणार आहे.आता विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करुन अलविदा करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
बिग बॉस हा असा खेळ आहे की ज्या घराच तुम्ही कितीही मोठे स्टार असला तरी तुमच्या खरा चेहरा या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत असतो. अनेकांना या शोने नाव, ओळक तसेच लोकप्रियता दिली आहे. या शोमध्ये आल्या नंतर अनेकांचे करिअर झाले आहे. आता याच शोमध्ये पुण्याचा जय दुधाणे याला महेश मांजरेकर यांच्याकडून सिनेमाची ऑफर मिळाली आहे. या सिनेमाचे नाव शनिवारवाडा असल्याचे महेश मांजरेकर यांनी जाहीर केले आहे. वाचा- PHOTOS : Rajinikanthची ऑनस्क्रीन बहिण Keerthy Sureshने सेलिब्रेट केला Christmas विशाल निकम, जय दुधाणे, विकास पाटील यांच्यापैकी सोशल मीडियावर विशालचे नाव विजेते पदाच्या आघाडीवर आहे. सोशल मीडियावर विशालचे नाव ट्रेडिंगमध्ये आहे. मात्र प्रेक्षक यापैकी कोणाच्या नावाला पसंती देत आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.