मुंबई, 2 मार्च- ‘बिग बॉस मराठी 3’ च्या माध्यमातून अभिनेता जय दुधाणे आणि अभिनेत्री मीरा जग्गनाथ घराघरात पोहोचले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. बिग बॉस घरातून बाहेर पडल्यानंतर मीरा आणि “जोडी दोघांची दिसते चिकनी” या म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. जय दुधाणेने सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. जय दुधाणेने मीरासोबतच्या नवीन प्रोजेक्टचे पोस्टर शेअर करत म्हटलं आहे की, मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे या चिकनी जोडीचा पुन्हा जीव रंगलाय गो ❤️✨ ‘सप्तसूर म्युझिक’चे साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष शुभ मुहूर्तावर तुमच्या भेटीस घेऊन येत आहेत सिद्धी तुरे आणि अशोक काजळे यांच्या आवाजातील नवं कोरं गाणं ‘जीव रंगलाय गो’ #JivRanglayGo #ComingSoon जयच्या या पोस्टवर चाहच्यांनी कमेंटचा वर्षाव तर केलाच आहे. वाचा- ‘मुरांबा’ फेम अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ; दणक्यात पार पडला साखरपुडा शिवाय मीराला आणि जयला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील सांगितलं आहे. जय आणि मीराच्या या नव्या व्हिडिओ अल्बमसाठी चाहते उत्सुक तर आहेच शिवाय त्यांनी या दोघाचं नवीन प्रोजेक्टसाठी कौतुक केलं आहे.
एमटीव्हीवरच्या स्प्लिट्सव्हिला (Splitsvilla) या रिअॅलिटी शोच्या तेराव्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला. देखणा आणि उत्तम शरीरयष्टी असलेल्या या अभिनेत्यानं बिगबॉसच्या अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवलं. तर मीरानं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकातून आपला अभिनय प्रवास सुरू केला. बिग बॉसमध्ये मीराचाही समावेश होता. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर दोघेही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहेत. याशिवाय दोघेही आपल्या चाहत्यांबरोबरही सतत संवाद साधत असतात.
बिग बॉस मराठी 3 या रिअॅलिटी शोचा उपविजेता जय दुधाणे आणि याच शोधमील स्पर्धक असलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ पहिल्यांदाच “जोडी दोघांची दिसते चिकनी” या म्युझिक व्हिडिओमध्ये पहिल्यांजा एकत्र आले होते. हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच झाला होता.