मुंबई. 27 ऑक्टोबर : आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे (Aryan Khan Drugs Case) महाराष्ट्रीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या प्रकराणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात मराठी चित्रपटसृष्टीतील एकही कलाकार क्रांतीच्या बाजूने बोलण्यास तयार नसल्याचं चित्र दिसत आहेत. मराठी कलाकारांपैकी कुणीही क्रांतीला जाहीरपणे पाठिंबा दर्शवला नसल्याने या गोष्टीचं वाईट असल्याचं ट्विट लोकप्रिय अभिनेता आरोह वेलणकर याने केलं आहे. त्याचं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. अभिनेता आरोह वेलणकरने ट्विट करत क्रांतीला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. आरोहने ट्विट करत लिहिलं आहे की, ‘क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इण्डस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहीत आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.’
क्रांती रेडकरने पत्रकार परिषदेमध्ये नेमक काय म्हणाली होती ? क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन म्हटली होती की, ‘मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मला महाराष्ट्रातून, देशभरातून पाठिंब्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण मला आणि माझ्या कुटुंबाला माझ्याच राज्यात कुणीतरी त्रास देतंय हे वाईट आहे. मला माझ्या राज्यात सुरक्षित वाटायला हवं ना?’ वाचा : Bigg Boss Marathi:टास्कमध्ये तुफान राडा! विशाल-विकासच्या मैत्रीचा होणार The End? तसेच ती पुढे म्हणली होती की, समीर वानखेडे केवळ देशसेवा करत आहेत. पण त्यांची प्रतीमा मलिन करण्याचे हे सर्व प्रयत्न आहेत. जे काही होतंय ते दु:खद आहे. त्यांना काही सिद्ध करायचं असेल तर ते केसशी निगडीत असलं पाहिजे, वैयक्तिक आयुष्याशी नाही. जे काही त्यांना सांगायचं असेल ते न्यायालयासमोर सांगावं. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. वाचा : ‘BB OTT’फेम दिव्या अग्रवालने रणवीर सिंहला दिली टक्कर;असा अतरंगी LOOK पाहून …. जर कोणी चुकीचं करत असेल तर त्याला जेलमध्येही पाठवता येऊ शकतं. परंतु हे सर्व सोशल मीडियावर का सुरू आहे. ही कोणती पीआर एजन्सी आहे, कोणी त्याना हायर केलंय, जे आम्हाला धमकी देत आहे, खुलेपणानं ट्रोल करत आहेत. जेव्हा तुम्ही ते तपासून पाहता तेव्हा ते खरे फॉलोअर्स नाहीयेत हे दिसून येतं. त्यांच्या शून्य फॉलोअर्स आहेत आणि शून्य ट्वीट्स आहेत. ते सर्व फेक अकाऊंट्स असून घाबरवण्यासाठी हे केलं जात आहे, असं क्रांती म्हणाली होती.
क्रांतीच्या या पत्रकार पऱिषदेनंतर आता सोनाली खऱे , मेघा धाडे या कलाकारांनी तिला समोर येऊन पाठिंबा दर्शवला आहे.