JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विकास गुप्ता म्हणतो, 'मी बायसेक्शुअल' VIDEO मध्ये झाली प्रसिद्ध अभिनेत्यांची पोलखोल

विकास गुप्ता म्हणतो, 'मी बायसेक्शुअल' VIDEO मध्ये झाली प्रसिद्ध अभिनेत्यांची पोलखोल

विकासनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यानं स्वतःच्या सेक्शुअलिटीवर भाष्य केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : टीव्ही प्रोड्युसर आणि बिग बॉस 11 चा प्रसिद्ध स्पर्धक विकास गुप्ता(Vikas Gupta) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. विकासनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यानं स्वतःबद्दलच्या सर्व वादांची उत्तर दिली आहेत. पण यासोबतचं त्यानं त्याच्या सेक्शुअलिटीवरही भाष्य केलं आहे. या व्हिडीओत त्यानं आपण बायसेक्शुअल असल्याचं सर्वांसमोर कबुल केलं आहे. यासोबतच त्यानं या गोष्टीचा त्याला किती त्रास झाला आणि काय काय समस्यांना सामोरं जावं लागलं याचाही खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ समथान (Parth Samthaan) आणि प्रियांक शर्मानं (Priyank Shrma)विकासवर निशाणा साधत हॅरासमेंटचा आरोप केला होता. याच आरोपांची सफाई देताना फक्त स्वतःच सत्य सांगितलेलं नाही तर पार्थ आणि प्रियांकचं सत्य सुद्धा सर्वांसमोर ठेवलं आहे. विकासनं सोशल मीडियवर अभिमाननं सांगितलं की, तो बायसेक्शुअल आहे. त्यानं सांगितलं, ‘मी अभिमाननं सांगतो की मी बायसेक्शुअल आहे आणि आता मला कोणी ब्लॅकमेल करणार नाही आणि बुलींग पण करणार नाही.’ Father’s Day: अभिनेत्रीला वडिलांनी दिला होता एकावेळी 4 बॉयफ्रेंड बनवण्याचा सल्ला

विकास गुप्तानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, मी आता यातून बाहेर येत आहे. मी जसा आहे सर्वांसमोर आहे. अभिमानानं उभा आहे. मला देवानं जसं बनवलं आहे त्या बाबत आता मी लाज किंवा बुलींग सहन करणार नाही. मी ही गोष्ट लपवली आणि त्यातून मला खूप त्रास झाला आहे. माझ्या कुटुंबानं मला सोडून दिलं. पार्थ समथान आणि प्रियांक शर्मानं खूप वाईट वागणूक दिली आहे. पण मी त्यांच्यासोबत असं नाही करणार. विकासनं या व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे की, प्रियांक आणि पार्थ यांच्यासोबत जे झालं त्यात त्या दोघांचा पूर्ण सहभाग होता. त्यामुळे त्यांनी माझ्यावर लावलेले आरोप हे पूर्णतः चुकीचे आहेत. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांमध्ये दिसला होता सुशांत, VIDEO व्हायरल विकासनं या पोस्टमध्ये त्याची आई, कुटुंब, अभिनेता करण कुंद्रा, एकता कपूर यांनी त्याला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत. विकास गुप्ता मागच्या काही दिवसांपासून खूप डिस्टर्ब दिसत होता. पण आता त्यानं स्वतःवर केल्या जात असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. विकासच्या या व्हिडीओवर पार्थ किंवा प्रियांकची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र विकासच्या चाहत्यांनी त्याला सपोर्ट केला आहे. ‘या लोकांमुळे त्यानं अंकिताशी ब्रेकअप केलं’ रंगोलीचा सुशांतच्या PR टीमवर निशाणा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या