JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: अब्दू-प्रियांकाच्या मैत्रीत फूट; शिव ठाकरेसोबत 'हे' स्पर्धक झाले नॉमिनेट

Bigg Boss 16: अब्दू-प्रियांकाच्या मैत्रीत फूट; शिव ठाकरेसोबत 'हे' स्पर्धक झाले नॉमिनेट

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो ‘बिग बॉस’चा सोळावा सीजन सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस 16’मधील दिवाळी स्पेशल एपिसोडनंतर मंगळवारी घरामध्ये एलिमिनेशनसाठी नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु झाली आहे.

जाहिरात

अब्दू-प्रियांका

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑक्टोबर-   टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो ‘बिग बॉस’ चा सोळावा सीजन सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस 16’मधील दिवाळी स्पेशल एपिसोडनंतर मंगळवारी घरामध्ये एलिमिनेशनसाठी नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु झाली आहे. या टास्कला अर्चना गौतमपासून सुरुवात करण्यात आली. बिग बॉस प्रथम अर्चनाला एका स्पर्धकाला नॉमिनेट करण्यास सांगतात आणि तिने गौरी नागोरीला नॉमिनेट केलं. यानंतर बिग बॉस सर्व स्पर्धकांना हॉरर टास्कद्वारे कुटुंबातील सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगतात. या टास्कमध्ये बिग बॉसने दोन-दोन स्पर्धकांच्या जोड्या बनवल्या होत्या. या टास्कमध्ये इतर स्पर्धक परीक्षकाच्या स्पर्धेत असणाऱ्या स्पर्धकांना आपली शोमध्ये राहण्याची क्षमता पटवून देताना दिसले. कालच्या एपिसोडमध्ये सर्वात प्रथम निम्रीत कौर अहलुवालिया आणि टीना दत्ता यांनी शालीनचा बचाव करत गौतम विजला नॉमिनेट केलं. नंतर निम्रीत कौर अहलुवालिया, सौंदर्या शर्मा, अब्दू रोजिक, शिव ठाकरे आणि टीना दत्ता यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. शिव आणि सुंबुल या दोघांनाही एकत्र आत पाठवलं जातं. सौंदर्या आणि शालीनला या दोघांपैकी एकाला नॉमिनेट करायचं होतं. परंतु विशेष म्हणजे शालीनला शिवाला वाचवायचं होतं. आणि सौंदर्याला सुंबुलला. पण निकाल सुंबलच्या बाजूने लावला जातो आणि दोघांनी शिव ठाकरेला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केलं आहे. (हे वाचा: Bigg Boss 16: गौतम-सौंदर्याच्या नात्याला करण जोहरने म्हटलं फेक; शालिनची घेतली शाळा **)**

संबंधित बातम्या

शिव ठाकरेने नाराजी व्यक्त करत शालीन-सौंदर्याच्या निर्णयाला पक्षपाती असल्याचं म्हटलं आहे. तथापि, सुंबुलनंतर निम्रीत कौरला शालीनच्या दृष्टिकोनाबद्दल समजावून सांगते. त्यानंतर अब्दू रोजिक आणि प्रियांका चहर चौधरी यांना या टास्कसाठी एकत्र बोलावलं जातं. यावेळी गौतम विज आणि सुंबुल यांच्या हातात नॉमिनेशनची प्रक्रिया दिली जाते. यावेळी गौतम आणि सुंबुल प्रियांका चहर चौधरीचा बचाव करत अब्दू रोजीकला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करतात.

गौतम वीज आणि सुंबुल तौकीर यावेळी प्रियांकाचा बचाव करताना कारण देतात की, अब्दू हा घरातील एक लोकप्रिय स्पर्धक आहे. त्याला बाहेरून प्रेक्षकांचा प्रचंड सपोर्ट मिळत आहे. त्यामुळे तो नॉमिनेशनमधून सहजरित्या स्वतःचा बचाव करु शकतो. त्यामुळे गौतम आणि सुंबुल अब्दूला नॉमिनेट करत प्रियांकाचा बचाव करतात. दरम्यान प्रियांका स्वतःचा पक्ष ,मांडत आपण आपले निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम असल्याचं सांगते. तसेच घरातील प्रत्येक टास्कमध्ये आपण अब्दूपेक्षा जास्त सक्रिय असल्याचंही सांगते. तर अब्दू नेहमी शिव ठाकरे आणि साजिद खान यांच्या म्हणण्यानुसार आपला खेळ खेळत असल्याचं सांगते. प्रियांकाच्या या आरोपानंतर अब्दू रोजीक तिच्यावर नाराज झालेला पाहायला मिळालं. यामुळे त्यांची मैत्री संपुष्ठात येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या