JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: शिव ठाकरे-सौंदर्या शर्मामध्ये कॉफीवरुन जोरदार राडा; अभिनेत्याने जोडले हात

Bigg Boss 16: शिव ठाकरे-सौंदर्या शर्मामध्ये कॉफीवरुन जोरदार राडा; अभिनेत्याने जोडले हात

सध्या सर्वांचं लक्ष ‘बॉस’कडे लागून आहे. बिग बॉस मराठी असो किंवा बिग बॉस हिंदी प्रेक्षक दोन्ही कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत. एकीकडे बिग बॉस मराठीमध्ये जेवणावरुन घरातील सदस्यांनी प्रसादसोबत वाद घातला तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीमध्येसुद्धा तेच घडताना दिसतंय.

जाहिरात

फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 ऑक्टोबर-   सध्या सर्वांचं लक्ष ’ बिग बॉस’कडे लागून आहे. बिग बॉस मराठी असो किंवा बिग बॉस हिंदी प्रेक्षक दोन्ही कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत. एकीकडे बिग बॉस मराठीमध्ये जेवणावरुन घरातील सदस्यांनी प्रसादसोबत वाद घातला तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीमध्येसुद्धा तेच घडताना दिसतंय. बिग बॉसच्या सोळाव्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यात घरात राडे होताना दिसून येत आहेत. पाहूया नेमकं घडलंय. लेटेस्ट एपिसोडमध्ये नुकतंच स्पर्धकांनी साजिद खानच्या स्टँड अप कॉमेडीचा आनंद घेतला. त्याचवेळी घरातील रेशनबाबत काही स्पर्धकांमध्ये वाद झाला. शोच्या सुरुवातीलाच बिग बॉसने साजिद खानला स्टँड-अप कॉमेडी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार साजिदने बिग बॉसच्या आदेशाचं पालन केलं. यावेळी साजिदला कुटुंबातील इतर सदस्यांनी रेटिंगसुद्धा दिलं. यानंतर बिग बॉसने साजिदला रेशन वाटपाचे आदेश दिले. बिग बॉसने सांगितले की, कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळालेल्या रेशननुसार जेवण करावं लागेल. परंतु यावरुन घरात चांगलाच वाद झालेला दिसून आला. रेशनमध्ये मिळालेल्या चिकनच्या वाटणीवरुन सृजिता डे आणि शालिन भानोत यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर बिग बॉसने गौतम विज, सृजिता आणि शालिन यांना कन्फेशन रूममध्ये बोलावलं. यावेळी बिग बॉसने शालिनला त्याच्या वैद्यकीय स्थितीबद्दल संपूर्ण सत्य सांगण्यास सांगितलं. तयार शालिनने सांगितलं की, त्याला 200 ग्रॅमची गरज आहे आणि चिकन साडेतीन किलोग्रॅम आहे. अशात आपली वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन रेशन दिलं जावं असं त्याने म्हटलं.

दरम्यान कन्फेशन रुममधून बाहेर आल्यानंतर सृजिता आणि शालिनमध्ये पुन्हा जोराचा वाद झाला. त्याचवेळी मराठी बिग बॉस विजेता आणि बिग बॉस सोळाचा स्पर्धक शिव ठाकरे आणि सौंदर्या शर्मा यांच्यात कॉफीवरुन कडाक्याचं भांडण झालं. यावेळी साजिद खानने दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी दोघेही शांत होण्याचा नाव घेत नव्हतं. यावेळी सुंबुल तौकीर त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करते. परंतु ते दोघे शांत होण्याऐवजी. शिव आणि सुंबुलमध्येच वाद झालेला दिसून आला.

संबंधित बातम्या

(हे वाचा: ‘माझ्या जन्मासोबतच…’; बिग बॉस 16 च्या घरात अभिनेत्रीचं हृदयस्पर्शी रॅप, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी **)** या सर्व वादविवादानंतर शिव ठाकरे एकटा बसून भावुक होताना दिसला. त्यामुळे साजिद त्याच्याकडे जातो आणि त्याला सौंदर्या शर्माची माफी मागायला सांगतो. शिव एकदा सौंदर्याकडे जातो आणि तिला सॉरी म्हणतो, पण सौंदर्या म्हणते की तिला ते जाणवलं नाही शिवने फक्त बोलायला सॉरी म्हटलं आहे. शिव सौंदर्यापुढे नतमस्तक होतो, हात जोडतो पण सौंदर्या त्याला असं काही न करण्यास सांगते. आणि त्यांनतर पुन्हा दोघांमध्ये बिनसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या