शिव ठाकरे
मुंबई, 11 नोव्हेंबर : बिग बॉसचा 16 सीझन सध्या टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉसच्या घरात उत्तम टास्क खेळणारा आणि सगळ्यांना समजून घेणाऱ्या शिवला बिग बॉसच्या घरात मारहाण करण्यात आली. साजिद खान आणि गौरीचं भांडण सुरू असताना मध्ये पडलेल्या शिवला अर्चनानं मारहाण केली. अर्चनानं थेट शिवचा गळा धरल्याचं पाहायला मिळालं. परिणामी अर्चनाला बिग बॉसनं घरचा आहेर दिला आहे. घरातील सगळ्या सदस्यांनी या प्रकाराचा निषेध केला त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करण्यात येतेय. पण आता हा प्रकार बघून प्रेक्षकांना मराठी बिग बॉसमध्ये घडलेला प्रसंग आठवला आहे. छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. या शोमध्ये येणारा प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण करतो. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात पराग सहभागी झाला होता. सध्या बिग बॉस हिंदीच्या घरात घडलेल्या एका प्रकारामुळे त्याला बिग बॉसच्या पर्वातील त्याचे दिवस आठवले आहेत. खरंतर बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये नेहा शितोळे आणि पराग मध्ये असाच वाद झाला होता. त्यावेळी अर्चनाच्या जागी पराग होता. त्यालाही घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तो आपली चांगली मैत्रीण असलेल्या नेहाच्या अंगावर धावून गेला होता. आता बिग बॉस 16 मध्ये घडलेला प्रकार पाहून त्याला जुना प्रसंग आठवला आहे. हेही वाचा - Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट; शिव ठाकरेला मारहाण करणाऱ्या अर्चनाची पुन्हा होणार एंट्री ? बिग बॉस हिंदीच्या घरात घडलेल्या एका प्रकारामुळे त्याला बिग बॉसच्या पर्वातील त्याचे दिवस आठवले आहेत.तोच किस्सा सांगत त्याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हाच प्रसंग सांगत परागने लिहिलंय कि, ‘‘शिव ठाकरे यांच्यावर झालेल्या हिंसक कृत्यामुळे अर्चना गौतमला घर सोडण्यास सांगण्यात आले. काही लोक या घटनेचा संबंध मी आणि नेहा शितोळे यांच्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेशी जोडत आहेत. पण खरे सांगायचे तर या दोन्ही घटना वेगळ्या आहेत. अर्चनाने नक्कीच चूक केली आहे. शिव नी नम्रतेने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण अर्चनाने विनाकारण ओव्हर रिऍक्ट केले. त्याची मान पकडण्याची आणि इतके हिंसक होण्याची गरज नव्हती. त्या घरात राहताना मी स्वतः या अनियंत्रित रागाच्या टप्प्यातून गेलो आहे. मी एक मोठी चूक केली.’’
त्याने पुढे म्हटलंय कि, ‘‘पण मला घरच्यांना पटवून माझे नशीब आजमावण्याची संधी मिळाली, जे शेवटी फ्लॉप ठरले. कारण कोणीही माझी माफी स्वीकारायला तयार नव्हते आणि मला राहू दिले नाही. मी ऐकले आहे की अर्चना गौतमला वीकेंडला सलमान खानसमोर आणले जाईल आणि तिलाही संधी दिली जाईल. शिव ठाकरे आणि इतर घरातील सदस्य तिची माफी मोठ्या मनाने स्वीकारतात आणि तिला शोमध्ये परत येऊ देतात का हे पाहणे मनोरंजक असेल.’’ ‘‘मी शिवला वैयक्तिकरित्या ओळखतो, त्याच्याकडे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे.. शिव नक्कीच तिची माफी स्वीकारेल. जर शिवने ही उदारता दाखवली तर माझे शब्द mark करा, तो आणखी लाखो मने जिंकेल आणि बिगबॉस 16 चे विजेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार असेल.’’ अशा भावना पराग कान्हेरेने व्यक्त केल्या आहेत.