सौंदर्या-टीना
मुंबई, 29 ऑक्टोबर- ‘बिग बॉस 16’ चा आता तिसरा आठवडा संपत आला आहे. या तीन आठवड्यात घरात बरीच उलथापालथ झाली आहे. अनेक रंजक गोष्टी घडताना दिसून येत आहेत. सध्या बिग बॉसने दिलेला टास्क पूर्ण न करु शकल्यामुळे घरामध्ये कोणीही कॅप्टन बनू शकलं नाहीय. त्यामुळे घर कॅप्टनशिवाय चालत आहे. दरम्यान ‘बिग बॉस 16’ च्या नवीन एपिसोडमध्ये टीना दत्ताने सह-स्पर्धक सौंदर्या शर्मावर इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स खरेदी केल्याचा आरोप केला आहे. शालीन भनौतशी बोलताना टीना म्हणाली की, तिने गेल्या 10 वर्षांत स्वत:साठी एक ब्रँड तयार केला आहे. तिचा दावा आहे की तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. जे तिने प्रत्यक्षात पैसे देऊन खरेदी केले आहेत. यावेळी शालिन भनौतशी बोलताना टीना म्हणाली की, मला घरातील प्रत्येकाची घाणेरडी रहस्ये माहित आहेत आणि ती शालीनशिवाय कोणाचीही पर्वा करत नाही. टीना शालीनला म्हणाली, ‘घरात फक्त तुझा प्रभाव आहे. इन्स्टाग्रामवर सौंदर्या शर्माचे ६.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. टीना म्हणाली की इतके फॉलोअर्स असूनही, सौंदर्याला तिच्या फोटोंवर 25-30 कमेंट्स मिळत नाहीत.घरामध्ये सध्या आपापसांत मैत्रीत फूट पडताना दिसून येत आहे. जे घरामध्ये आल्यापासून एका ग्रुपमध्ये होते आज त्यांच्यात मतभेद होताना दिसून येत आहेत. त्यामुळे हे एपिसोड अधिकच रंजक बनत आहेत. **(हे वाचा:** Bigg Boss 16: घरातील एकाही स्पर्धकाला जिंकता आला नाही कॅप्टन्सी टास्क; आता कॅप्टनशिवाय चालणार घर ) नुकतंच झालेल्या एका एपिसोडमध्ये, एका टास्क दरम्यान शालीन आपल्याकडे न आल्याने टीना नाराज झाली होती. ज्यामध्ये बिग बॉसने जाहीर केले होते की घरातील महिलांनी किमान पाच पुरुषांना चॉकलेट खाण्यासाठी तयार करुन त्यांच्याकडून प्रशंसा मिळवावी लागेल. जो कोणी हा टास्क आधी पूर्ण करेल, तो या टास्कचा विजेता असेल. यावेळी निम्रीतने हा टास्क पूर्ण करत जिंकला. त्यावेळी टीना बाथरुममध्ये जाऊन रडली आणि निम्रीतला विचारलं की, शालीनला खरंच वाटलं होतं की ती त्याला चॉकलेट खायला सांगेल? दरम्यान या एपिसोडमध्ये चॉकलेटचा टास्क पार पडला तर दुसरीकडे, अर्चना गौतम साजिद खानवर चिडली कारण त्याने तिचे क्रोइसॅन खाल्ले. त्यावरुन अर्चना आणि साजिदमध्ये वाद झाला. अर्चनाने साजिदवर त्यांच्या संमतीशिवाय इतरांचे अन्न खाल्ल्याचा आरोप केला होता,. परंतु नंतर त्यांनी भांडण सोडवलं. सलमान खानला यापूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. आता अभिनेत्याची प्रकृती उत्तम आहे. तो ‘शुक्रवार का वार’ होस्ट करताना दिसला होता.त्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामुळे त्याचे चाहते फारच आनंदी आहेत.
तसेच गेल्या एपिसोडमध्ये अर्चनाला कॅप्टन पदावरुन मुक्त करण्यात आलं. खरं तर अर्चनाला शिक्षा म्हणून बिग बॉसने तिला कॅप्टन बनवलं होतं. अर्चनाच्या वारंवार विनंतीनंतर ‘बिग बॉसने तिला कॅप्टन पदातून मुक्त केलं. त्यानंतर घरातील सदस्यांना एक हॉरर टास्क देत घरातील रेशन किंवा कॅप्टन पद अशी एक गोष्ट निवडण्याचे आदेश दिले होते. परंतु टास्कच्या शेवटी रेशनची निवड करत कॅप्टन पदाचा त्याग करण्यात आला होता. त्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरात कोणीही कॅप्टन नाहीय.