JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Big Boss 16: या स्पर्धकांमधली जवळीक ठरतेय चर्चेचा विषय; असू शकतं बीबी हाउसमधलं पुढचं कपल

Big Boss 16: या स्पर्धकांमधली जवळीक ठरतेय चर्चेचा विषय; असू शकतं बीबी हाउसमधलं पुढचं कपल

शालीन भानोत आणि टीना दत्ता हे स्पर्धक सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. या दोघांमधली जवळीक पाहता बीबी हाउसमधलं पुढचं कपल हे असू शकतं, असं बोललं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोबर : टेलिव्हिजनवरील बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो नेहमीच चर्चेत असतो. कधी प्रतिस्पर्ध्यांमधले वाद-विवाद तर कधी प्रेम प्रकरणांमुळे या शोची कायम चर्चा असते. बिग बॉस या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोचा 16 वा सीझन 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाला आहे. हा सीझन सुरू होण्यापूर्वीपासून या शोमधल्या घराची रचना, सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली. अन्य सीझन्सप्रमाणे हा सीझनदेखील अल्पावधीतच चर्चेत आला आहे. या शोमधले दोन स्पर्धक एकमेकांच्या अगदी जवळ येताना दिसत आहेत. त्यांची सध्याची केमिस्ट्री पाहता ते लवकरच `बीबी हाउस`मधलं पुढील कपल असू शकतं, असं बोललं जात आहे. एबीपी लाइव्ह ने या विषयीची माहिती दिली आहे. बिग बॉस 16 या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोला नुकतीच सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच हा शो चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या स्पर्धकांमधला संघर्ष टोकाला पोहोचला आहे, तर काही स्पर्धकांमध्ये प्रेम प्रकरणं सुरू झाल्याचं दिसत आहे. शालीन भानोत आणि टीना दत्ता हे स्पर्धक सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. या दोघांमधली जवळीक पाहता बीबी हाउसमधलं पुढचं कपल हे असू शकतं, असं बोललं जात आहे. या दोघांची जवळीक सध्या चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. बिग बॉस 16 शोच्या सुरुवातीच्या एपिसोडमध्ये टीना दत्ताला शालीन भानोतबद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसून आलं. शालीनवर अर्चनाला धक्का दिल्याचा आरोप लावण्यात आला होता आणि त्याला कॅप्टन्सीसाठी कायमचं तसंच दोन आठवड्यांसाठी नॉमिनेट करण्यात आलं. या प्रकारामुळे तो खूप व्यथित झाला होता. त्या दरम्यान त्याची स्थितीदेखील बिघडली होती. अशावेळी टिनाने त्याला सावरलं. आता शालीनला टीनाविषयी जवळीक वाटू लागली असून, त्याने आपल्या भावना टीनाला सांगितल्यादेखील आहेत. गेल्या एपिसोडमध्ये शालीन टीनाकडे आपल्या भावना व्यक्त करताना दिसला. यादरम्यान तो काहीसा घाबरला होता. कारण यात कुठेही चूक झाली तर लोकं आपल्याला दूषणं देतील कारण त्याच्यावर या पूर्वी अनेक आरोप लावण्यात आलेले आहेत. टीनानेदेखील हीच भीती व्यक्त केली. या वेळी शालीनने आपलं म्हणणं मांडताना सांगितलं होतं की, हे असं ठिकाण नाही जिथे तुम्ही 100 टक्के विश्वास ठेवू शकता, परंतु, मी तुला कधीही दुखावणार नाही, असं वचन देतो. हे वाचा -  मन उडू उडू झालं नंतर अंजिक्य हृताची जोडी पुन्हा एकत्र; शुटींगला सुरूवात त्यानंतर शालीनने टीनविषयी असलेली आपली भावना गौतमकडे व्यक्त केली. तेव्हा त्यावर गौतमने शालीनला चिडवलं. डायनिंग टेबलवर गौतम टीनासोबत फ्लर्ट करत शालीनला दुखवण्याचा प्रयत्न करताना दिसला. शालीन खरोखरच त्या दोघांमधली जवळीक पाहून दुखावला गेला. हे वाचा -  ‘कोण बनेल खरा पार्किंगचा किंग’;बिग बॉस 4च्या घरामध्ये रंगणार नवं कॅप्टन्सी कार्य दरम्यान एपिसोडमध्ये टीना आणि शालीनमध्ये शालीनच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीविषयी संवाद झाला. टीना म्हणते मला या गोष्टीची भीती वाटत आहे. शालीन आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांविषयी अप्रत्यक्षपणे बोलताना दिसला. मी एक मुलगा असणं ही प्रमुख समस्या आहे. कारण अपघात झाला तर नेहमीच दोष मुलाचाच असतो. एखाद्या माणसाकडून पूर्वीच अपघात घडला असेल तरी लोकं म्हणतात, हे असंच आहे. मी सगळ्या गोष्टी बिघडवू इच्छित नाही. मी काय गमवेन याची मला जाणीव आहे, त्यामुळे मी तिला दुखवू इच्छित नाही, असं शालीन म्हणाला. जेव्हा टीना शालीनशी त्याच्या आरोपांबद्दल बोलली तेव्हा शालीन म्हणाला,  जेव्हा मी तुला याबद्दल सांगेन, तेव्हा तू म्हणशील, की ही खरोखरच खूप किरकोळ बाब होती. मग टीनानी विचारलं, तू या सगळ्याबद्दल का बोलत नाही? त्यावर शालीन म्हणाला, मी फक्त याबद्दलच बोलत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या