JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: सलमान खानने सोडलं बिग बॉस 16? करण जोहर असणार नवा होस्ट

Bigg Boss 16: सलमान खानने सोडलं बिग बॉस 16? करण जोहर असणार नवा होस्ट

‘बिग बॉस’च्या सोळाव्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. शोच्या पहिल्याच तीन आठवड्यात घरामध्ये वादविवाद, प्रेम, मैत्री, राडे पाहायला मिळत आहेत. तसेच होस्ट सलमान खान आठवड्याच्या शेवटी या सर्वांची शाळा घेताना देखील दिसून येतो.

जाहिरात

सलमान खान-करण जोहर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑक्टोबर-  ‘बिग बॉस’ च्या सोळाव्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. शोच्या पहिल्याच तीन आठवड्यात घरामध्ये वादविवाद, प्रेम, मैत्री, राडे पाहायला मिळत आहेत. तसेच होस्ट सलमान खान आठवड्याच्या शेवटी या सर्वांची शाळा घेताना देखील दिसून येतो. सलमान या स्पर्धकांना त्यांच्या आठवड्याच्या खेळाचा लेखाजोखा देत असतो. त्यामुळे सलमान खानशिवाय बिग बॉसची कल्पनाच करणं शक्य होत नाही. असेही अनेक लोक आहेत जे खास सलमान खानसाठी हा शो पाहतात. परंतु अचानक शोमधून सलमान खानलाच रिप्लेस केलं तर? झाला ना चकित? येत्या काही एपिसोडमध्ये अभिनेता-होस्ट सलमान खान बिग बॉसमध्ये दिसणार नाहीय. सलमान खानच्या जागी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर बिग बॉसच्या होस्टिंगची धुरा संभाळणार आहे. हे वृत्त समोर येताच सलमान खानचे चाहते निराश झाले आहेत. सलमान खान आता पुन्हा बिग बॉसमध्ये दिसणार की नाही अशी अनेकांना चिंता वाटत आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर फक्त काही आठवडे ‘बिग बॉस’चा सोळावा सीजन होस्ट असणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सलमान खानला डेंग्यू झाल्याचं निदान झालं आहे, त्यामुळे तो ‘बिग बॉस 16’चे पुढील काही भाग होस्ट करणार नाही. अशातच सलमानला रिप्लेस म्हणून करण जोहरला बिग बॉस होस्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान करण जोहर सलमानलाही नकार देऊ शकला नाही. कारण तो नेहमीच कठीण काळात करण जोहरच्या पाठीशी उभा राहिला आहे. **(हे वाचा:** Shiv Thakare : प्रेमात पडल्याच्या चर्चांना शिव ठाकरेचा पूर्णविराम; म्हणाला ‘संबूल आणि मी… ) सलमान खान आणि करण जोहर यांचं नातं फारच छान आहे. सलमान खानने करण जोहरला एका मोठ्या अडचणीत मदतीचा हात दिला होता. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात इतर कलाकारांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारला नकार दिला होता. तेव्हा सलमान खानने पुढे येत, करण जोहरला मदतीचा हात दिला होता. आणि या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. सलमान खानला या चित्रपटात फारशी भूमिका नव्हती. मात्र जितकी भूमिका होती, तितकी सलमान खानने अगदी चोख पार पाडली होती. त्यामुळे सलमान खान आणि करण जोहर नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र म्हणून दिसले आहेत. करण जोहरबाबत सांगायचं तर करणने बिग बॉस ओटीटी हा शो होस्ट केला आहे. गेल्या वर्षी टेलिव्हिजनवर बिग बॉसचा 15वा सीजन सुरु होण्यापूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस ओटीटी’ प्रसारित करण्यात आला होता. या शोलासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. हा शो करण जोहरने होस्ट केला होता. यामध्ये करणने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती. अनेकवेळा तो स्पर्धकांच्या वागण्याने नाराजदेखील झाला होता. या शोमध्ये प्रतीक सेहेजपाल, निशांत भट्ट, श्मिट शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद, दिव्या अग्रवाल, नेहा भसीन यांसारखे स्पर्धक सहभागी झाले होते. दरम्यान दिव्या अग्रवालने हा शो जिंकला होता.

बिग बॉस सोळाव्या अपडेटबाबत सांगायचं झालं तर, या आठवड्यात बिग बॉसने दिलेल्या आदेशावरून, घरातील सर्वात कमी योगदान असलेल्या सदस्याचं नाव सांगायचं होतं. यामध्ये शालिन भनौत आणि टीना दत्ताने सुंबुल तौकीर खानचं नाव घेतलं होतं. त्यामुळे या आठवड्यात जाण्यासाठी मान्या सिंग, शालिन भनौत आणि सुंबुल तौकीर हे तीन सदस्य नॉमिनेट झाले आहेत. दरम्यान बिग बॉसने शिव ठाकरेकडून कॅप्टन्सीपद काढून घेत अर्चना गौतमला घरातील नवा कॅप्टन म्हणून नेमलं आहे. आता अर्चना हे कार्य कसं पार पाडते. पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या