मुंबई. 17 ऑक्टोबर : बिग बॉस 14 (Bigg Boss 14) फेम पवित्रा पुनिया (Pavitra Punia) या अभिनेत्रीसह एक गंभीर (Pavitra Punia Accident) घटना घडली आहे. यानंतर डॉक्टरांनी तिला तीन आठवड्यासाठी बेड रेस्ट म्हणजे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पवित्राचे फॅन देखील यामुळे चिंतेत आहेत. पवित्राच्या पायाला दुखापत झाली आहे. घर शिफ्ट करत असताना तिच्या पायाला दुखापत झाल्यचे समोर आलं आहे. पवित्रा पुनियाने टाइम्स ऑफ इंडियाला या घटनेची माहिती देताना सांगितले की, लिव्हिंग रूममध्ये साहित्या लावत होती त्यावेळी सेंटर टेबलवरील एक काचेचा तुकडा हातातून घसरला आणि तिच्या डाव्या पायावर पडला आणि ही दुखापत झाल्याची सांगितलं. तिने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘काच खूप जड होती आणि जेव्हा ती माझ्या हातातून घसरली आणि तेवहा ती माझ्या पायावर पडली. ही घटना जेव्हा घडल्यानंतर माझ्या लक्षात आले की ही जखम काही सामान्य नाही. संध्याकाळपर्यंत पाय सुजले आणि मला चालायला त्रास होऊ लागला. ती पुढे म्हणाली की, या घटनेच्या एक दिवसानंतर, मी एक्स-रे साठी गेले तर तिथे मला समजले की लिगामेंट इंज्यूरी आहे. त्यानंतर डॉक्टरांनी मला तीन आठवडे बेड रेस्टचा सल्ला दिला आहे.’
पवित्रा पुनियाला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी 20 ऑक्टोबरला तिचे शूट असल्याने ती दिल्लीला रवाना होणार आहे. या शूटबद्दल ती म्हणाली की, मी असं काम सोडू शकत नाही, कारण तिने या शूटसाठी कमिटमेंट दिली आहे, त्यामुळे शूट रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पवित्राचा पुढील 10 दिवस शूटिंगचा प्लॅन आहे, त्यानंतर ती आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करणार आहे. वाचा- Aryan khan ने एनसीबीला दिले मोठे वचन; म्हणाला, ‘मी बाहेर आल्यावर…’ तिचा जवळचा आणि खास मित्र एजाज खानबद्दल बोलताना म्हणाली की, तो देखील सध्या शुटींगसाठी बाहेर गेला आहे. बिग बॉस 14 मध्ये पवित्र आणि एजाज एकत्र दिसले होते. सुरुवातीला दोघेही भांडताना दिसले, पण शोच्या अखेरीस दोघांनी कबूल केले की त्यांचे नाते खूप खास आहे. दोघांची केमिस्ट्री पाहून घरातील सदस्यांनी त्यांना ‘लव्ह बर्ड्स’चा दर्जाही दिला. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.