मुंबई, 2 एप्रिल- हिंदी पडदा गाजवल्यानंतर देखील अनेक मोठमोठे कलाकार मराठीत काम करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. आता हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा मराठी सिनेमात नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉस 15 विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ( big boss 15 winner tejasswi prakash) लवकरच एका मराठी सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत पडद्यावर मराठी मनोरंजन विश्वातील क्यूट बॉय अभिनेता अभिनय बेर्डे देखील दिसणार आहे. तेजस्वी प्रकाशनं सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत तिच्या आगामी मराठी सिनेमाबद्दल ( Man Kasturi Re ) माहिती दिली आहे. शिवाय सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तिच्या आगामी मराठी सिनेमाचं नाव “मन कस्तुरी रे” असं आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अभिनय बेर्डे देखील दिसणार आहे. पोस्टरवरून आणि सिनेमाच्या नावावरून चित्रपट रोमॅंटिक असणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. चाहते देखील तेजस्वीला मराठी सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- PHOTOS: सुयश-आयुषीचा लग्नानंतरचा पहिला पाडवा, पारंपरिक वेशात दिसले फारच सुंदर तेजस्वी प्रकाशचं मराठी सर्वांनी बिग बॉस मराठीच्या घरात सर्वांनी अनुभवलं आहे. तेजस्वी मराठी मुलगी म्हणजे फूलटू मंबई गर्ल आहे. सध्या ती नागिन या मालिकेत दिसत आहे. शिवाय ती सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रीय असते. करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळं देखील ती सतत चर्चेत असते. दोघेही एकमेंकासोबतचं रोमॅंटिक फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात.
तेजस्वी प्रकाशने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्स या विषयांमध्ये अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली, त्यानंतर अभियांत्रिकीची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती अभिनयाकडे वळाली. तेजस्वी प्रकाशने वयाच्या 18 व्या वर्षी करिअरची सुरूवात केली. तेजस्वी हिने वर्ष 2012 मध्ये टीव्ही शो ‘2612’ पासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली. त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनों की, स्वरागिनी जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की व ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे. यानंतर तिनं रोहित शेट्टीचा शो ‘खतरों के खिलाड़ी’च्या 10 व्या सिजनमध्ये सहभाग नोंदवला होता. तिने आपल्या भयंकर स्टंट्सने प्रेक्षकांची मने जिंकली होती.