मुंबई, 12 ऑक्टोबर : रिअलिटी शो ‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो मानला जातो. या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही गोंधळ हमखास पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच या शोच्या 13 व्या सीझनला सुरुवात झाली. मात्र यावेळी हा सीझन सुरू होऊन जेमतेम एखादा आठवडा होतो न होतो तोपर्यंतच हा शो बंद करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. सोशल मीडियावर काही हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. ज्यांच्या माध्यमातून बिग बॉस 13 ला जोरदार विरोध केला जात आहे आणि यामागचं धक्कादायक कारण सुद्धा आता समोर आलं आहे. बिग बॉस या कार्यक्रमावर बंदी आणावी यासाठी करणी सेनेनं मागणी केल्यानंतर ट्विटरवरही या कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी अनेकांकडून होतेय. हा शो अश्लीलतेला आणि लव्ह जिहादला खतपाणी घालतोय असा अनेकांचा आक्षेप आहे. या शो मध्ये बेड फ्रेण्ड्स फॉरेव्हर असे म्हणत महिला आणि पुरुष यांना एकाच बेडवर झोपण्यास सांगितलं जातंय यावरून अनेक जण बिग बॉसवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत.त्यामुळे या पुढे माहिती आणि प्रसारण मंत्रालय या शोवर करडी नजर ठेवणार असल्याचं बोललं जातं आहे.
Vicky Welingkar Poster : काय या मुखवट्यामागे दडलेल्या चेहऱ्याचं रहस्य!
‘बिग बॉस चे प्रसारण बंद करावे अशी मागणी करणारं पत्र आलं आहे आणि माझं खातं ते जे काय दाखवत आहेत ते आक्षेपार्ह आहे का याचा अभ्यास करून 8 दिवसात अहवाल देतील.’ अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मागच्या काही दिवसांपासून ट्विटरवर #UnsubscribeColoursTV, #Boycott_BigBoss, #JehadFelataBigBoss सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. एवढंच नाही तर अनेकजण सलमान खानला ब्लॉक करुन त्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करतना दिसत आहेत. हे सर्व होण्यामागचं मुख्य कारण आहे बिग बॉस 13 ची थीम आणि नव्या घराचा सेटअप.
‘माझ्या लेकीला कोणाची नजर न लागो’ अमृता सिंहचे साराला काजळ लावतानाचे Photo Viral
हे आहे विरोधाचं कारण या सीझनच्या सुरुवातीलाच घरात एंट्री करणाऱ्या स्पर्धकांना सलमान खाननं त्यांचा BFF कोण असणार आहे हे सांगितलं होतं. या BFF च्या संकल्पनेनुसार यावेळी एका वेळी एका बेडवर 2 व्यक्ती झोपणार आहेत. तर बिग बॉस 13 च्या सुरुवातीपासूनच मुलं आणि मुली एक बेड शेअर करत आहेत आणि प्रेक्षक बिग बॉसच्या या फॉरमॅटचा विरोध करत आहेत. यापूर्वी भाजपा नेत्यानंही केला होता विरोध बिग बॉस 13 बाबत भाजपा नेता सत्यदेव पचौरी यांनी नाराजीपूर्ण ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, हे बिग बॉस नाही तर अय्याशी करणाऱ्यांचा हा अड्डा आहे. या शोला आमचा पूर्ण विरोध असून हा शो लवकरात लवकर बंद करावा. खरंतर मी यांचा अद्याप एकही एपिसोड पाहिलेला नाही. मात्र याबद्दल सगळीकडे बरंच काही बोललं जात आहे त्यातून माहिती मिळते. हे असे शो समाजात चुकीचा संदेश पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यामुळे ते लगेचच बंद करण्यात यावेत. #UnsubscribeColoursTV लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा शो एका युजरनं लिहिलं, ‘सलमान खानजी सिनेमामध्ये देशभक्ताची भूमिका साकारणारा एवढा खालच्या पातळीला गेला आहे. पैशांसाठी सर्व काही चुकीच होत असलेलं दिसूनही डोळे बंद केले आहेत की, पैशाच्या लालचानं मुलींकडून अशाप्रकारच्या गोष्टी करुन घेऊन लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहात का? तुम्ही कोणाला बहिण मानता का?’
हे सर्व अशाप्रकारचे ट्वीट पाहिल्यावर खरंच असं वाटतं कि, बिग बॉसच्या मेकर्ससाठी येत्या काळात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या विरोधानंतर घरातील फॉरमॅट बदलला जातो की, तसाच राहतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
Fatteshikast Trailer: शिवाजी महाराजांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार
======================================================= ‘370चं भांडवल करणारे 371 वर गप्प का?’ शरद पवारांचा अमित शाहांना सवाल