मुंबई, 05 जून : सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतीक्षित भारत सिनेमा आज प्रदर्शित झाला. बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मंगळवारी सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. सिनेमा पाहण्यासाठी सुनील शेट्टी, अनिल कपूर, तब्बू, बॉबी देओल, सनी लिओनी, संजय लीला भन्साळी, महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ आणि क्रिती सेनन सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सिनेमा पाहिल्यानंतर सर्वांनी सिनेमाचं फक्त कौतुकच केलं नाही तर सोशल मीडियावर लोकांना हा सिनेमा पाहण्याचं आवाहनही केलं. अनेकांनी सिनेमा पाहिल्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे भारत सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट असेल असं दिसतंय. समीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमाचं खूप कौतुक केलं. त्यांनी ‘भारत’ला 4 स्टार दिले आहेत. तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘एक भावनिक प्रवास जो तुमची मनं जिंकेल… सलमान या सिनेमाची लाइफलाइन आहे…त्यानं त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे…कतरिनानंही खूप चांगलं काम केलं आहे…अली अब्बास जफरचं दिग्दर्शनही चांगलं झालंय… काही एडिटिंगच्या बाबी सोडता बाकी सिनेमा उत्तम आहे.’ Bharat Public Review- अॅक्शन नाही तर रडवतो सलमानचा ‘भारत
याशिवाय ‘न्यूज 18 नेटवर्क’नं भारतला 3 स्टार तर ‘फर्स्टपोस्ट’नं 2 स्टार दिले आहेत. तसेच ‘इंडियन एक्सप्रेस’नं 2.5 स्टार आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं 3.5 स्टार दिलेत तर ‘पिंकव्हिला’नं ‘भारत’ला 4.5 स्टार दिले आहेत. सलमान खानच्या एण्ट्रीवर थिएटरमध्ये वाजल्या शिट्ट्या, लोकांनी उडवले पैसे अली अब्बास दिग्दर्शित भारत हा सिनेमा ओड टू माय फादर या कोरिअन फिल्मचा रिमेक आहे. या सिनेमात सलमान खान प्रमुख भूमिकेत असून त्यानं भारत या व्यक्तिरेखेच्या तारुण्य ते म्हातारपण अशा वेगवेगळ्या छटा या सिनेमात रंगवल्या आहेत. तसेच कतरिनानंही कुमुद रैनाच्या भूमिकेला आपल्या दमदार अभिनयातून योग्य न्याय दिला आहे. याशिवाय दिशा पाटनी, सुनील ग्रोवर, तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांनीही आपापल्या भूमिकांनी न्याय दिला आहे. Bharat ची अभिनेत्री दिशा पाटनी सारखी फिगर हवी, फॉलो ‘हा’ डाएट प्लान ===================================================================== SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका