मुंबई, 11 जून : सलमान खानच्या भारत सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या 150 कोटींचा गल्ला पार केला असून प्रेक्षकांकडून या सिनेमाला खूप प्रतिसाद लाभत आहे. पण या सिनेमातील एका अभिनेत्रीवर मात्र बँकॉकच्या गल्लीत कपडे विकण्याची वेळ आली आहे. ‘भारत’ अभिनेत्री नोरा फतेही सध्या बँकॉकमध्ये असून ती त्या ठिकाणी कपडे विकत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बँकॉकच्या लोकल मार्केटमधील असल्याचं बोललं जात आहे. अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक, बायोमध्ये लिहिलं ‘लव्ह पाकिस्तान’ दिलबर गाण्यामुळे लोकप्रिय ठरलेल्या नोरा फतेहीला सलमान खाननं त्याच्या ‘भारत’ सिनेमामध्ये तिला संधी दिली. या सिनेमामध्ये ‘तुर्पेआ’ या गाण्यावर नोरानं डान्स केला असून याव्यतिरिक्त तिनं या सिनेमामध्ये अभिनय सुद्धा केला आहे. पण आता नोरा बँकॉकमध्ये कपडे विकताना दिसल्यानं तिचे चाहते सुद्धा अवाक झाले आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नोरा पीच कलरचं टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये असून ती एका ग्राहकाला हिरव्या रंगाची शॉर्ट पॅन्ट दाखवताना दिसत आहे. BHARAT ची ‘ही’ अभिनेत्री दिसली आदित्य ठाकरेंबरोबर
नोरा यावेळी नो मेकअप लुकमध्ये होती. त्यामुळे ती हुबेहूब एखाद्या सेल्सपर्सन दिसत आहे. तिच्या आजूबाजूला कपड्यांचा ढीग पडला आहे आणि यातील सर्वात खास गोष्ट अशी की नोरा चक्क तिथल्या स्थानिक भाषेत ग्राहकांशी डील करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला नोराचा हा व्हिडिओ तिच्या एका फॅनपेज वरून शेअर करण्यात आला आहे. प्रेग्नंसीनंतर सानिया मिर्झानं 5 महिन्यात असं कमी केलं 22 किलो वजन, पाहा व्हिडिओ
नोरा फतेहीनं सलमानच्या ‘भारत’ सिनेमामध्ये एका लॅटिन अमेरिकन मुलीची भूमिका साकारली आहे. नोराच्या या भूमिकेचं सर्व शूटिंग माल्टा येथे झालं असून ‘भारत’ मधील या भूमिकेसाठी नोरा लॅटिन अमेरिकन भाषा सुद्धा शिकली. भारतच्या अगोदर नोराच्या दिलबर गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तिचा हा व्हिडिओ 12 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. नोरा लवकरच वरुण धवन आणि श्रद्घा कपूर सोबत स्ट्रीट डान्सर सिनेमामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 24 जानेवारी 2020ला रिलीज होणार आहे.