JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्याच्या कारला अपघात, लोणावळ्याला जाणं पडलं महागात

'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्याच्या कारला अपघात, लोणावळ्याला जाणं पडलं महागात

‘भाग्यलक्ष्मी’ या टीव्ही शोमधून लोकप्रिय झालेला अभिनेता आकाश चौधरी लोणावळ्याला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघाला होता. नवी मुंबईवरुन लोणावळ्याकडे निघाला असताना त्याच्या कारला एका ट्रक चालकानं मागून धडक दिली.

जाहिरात

'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्याचा कारला अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : ‘भाग्यलक्ष्मी’ या टीव्ही शोमधून लोकप्रिय झालेला अभिनेता आकाश चौधरी  लोणावळ्याला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघाला होता. नवी मुंबईवरुन लोणावळ्याकडे निघाला असताना त्याच्या कारला एका ट्रक चालकानं मागून धडक दिली. त्यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.आकाशने सीट बेल्ट घातला होता आणि त्याचा कुत्रा हेजल देखील त्याच्यासोबत होता या अपघाताचा आकाश चौधरीच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. आकाश हा त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन लोणावळ्याला निघाला होता. त्यावेळी त्याचा अपघात झाला. त्यात आकाशला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा- ‘काही ही माहीत नसताना…’ हेमांगी कवीची रवींद्र महाजनींविषयीची पोस्ट व्हायरल मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेत्याने सांगितले की, ‘ट्रकने धडक दिली तेव्हा मला ते कळलेच नाही. मला दुखापत झाली नाही, परंतु अपघाताने मला हादरवून सोडले, माझी झोप उडाली. मी सुट्टीवर होतो, पण मला रात्री झोप येत नव्हती. रस्त्यावर काय झाले असेल या विचाराने रात्रभर मी झोपलो नाही. जीवन किती अस्थिर असू शकते याची मला जाणीव झाली. मी देवाचा आभारी आहे, त्याने आम्हाला सुरक्षित ठेवले.

अपघातानंतर आकाश चौधरीने ट्रकचालकाला निष्काळजीपणामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली. ते पुढे म्हणतात, ‘वैभवी उपाध्याय आणि देवराज पटेल यांना अचानक एका रस्त्यावरील अपघातात गमावल्यानंतर मी रस्त्यावर गाडी चालवताना खूप घाबरलो होतो. पोलीस खूप सतर्क होते, त्यांनी येऊन ड्रायव्हरला अटक केली, पण तो गरीब माणूस असल्याने मी माझी तक्रार मागे घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या