JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bhabiji Ghar Par Hain ला नेहा पेंडसेचा अलविदा, 'ही' अभिनेत्री साकारणार अनिता भाभीचा भूमिका

Bhabiji Ghar Par Hain ला नेहा पेंडसेचा अलविदा, 'ही' अभिनेत्री साकारणार अनिता भाभीचा भूमिका

‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabiji Ghar Par Hain)या लोकप्रिय शोच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा नवीन अनिता भाभीचा शोध सुरू केला आहे. सौम्या टंडननंतर अभिनेत्री नेहा पेंडसे( Nehha Pendse) हिने देखील अलविदा केलं आहे.

जाहिरात

Bhabiji Ghar Par Hain

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 फेब्रुवारी: ‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabiji Ghar Par Hain) या लोकप्रिय शोच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा नवीन अनिता भाभीचा शोध सुरू केला आहे. 2020 मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारलेल्या सौम्या टंडनने (Saumya Tandon) मालिकेला राम राम केल्यानंतर आता अभिनेत्री नेहा पेंडसे( Nehha Pendse) हिने भाभीची भूमिका साकारली होती. दरम्यान आता तिनेही मालिकेला अलविदा म्हटलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता अनिता भाभीचा भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता लागली आहे. नेहा पेंडसे (Nehha Pendse) चा करार संपला आहे आणि ती काही महिन्यांतच शो सोडणार आहे. अनिता भाभीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत ‘पिया अलबेला’ अभिनेत्री शीन दासचे नाव आघाडीवर आहे. मात्र, अद्याप कोण भूमिका साकारणार हे निश्चित झालेलं नाही. यापूर्वी, शीन ‘सिलसिला प्यार का’, ‘पिया अलबेला’, ‘शादी के सियापे’ आणि ‘इंडियावाली मां’ सारख्या शोमध्ये दिसली आहे. नेहा पेंडसे ने शो सोडण्याचे कारण म्हणजे लांबचा प्रवास. नेहाला सेटवर येण्यासाठी अनेक तास प्रवास करावा लागतो. तिला सेटवरून घरी आणि घरातून सेटवर जाण्यासाठी अनेक तास लागतात. त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावरही होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या