JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Baipan Bhari deva Box Office Collection : बाईपण भारी देवा! 3 दिवसात 6 कोटी; पहिल्या आठवड्याची एकूण कमाई थक्क करणारी

Baipan Bhari deva Box Office Collection : बाईपण भारी देवा! 3 दिवसात 6 कोटी; पहिल्या आठवड्याची एकूण कमाई थक्क करणारी

हा बायकांनी घातलेला कल्ला प्रेक्षकांनी इतका डोक्यावर घेतलाय की सिनेमाची यशस्वी घोडदौड आता पुढचे काही महिने सुरू राहिल यात काही शंका नाही.

जाहिरात

बाईपण भारी देवा बॉक्स ऑफिस कलेक्शन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जुलै : केदार शिंदे दिग्दर्शिक बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करतोय. 30 जूनला सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. प्रत्येक स्त्री आणि पुरूषाने पाहायला हवा असा अशा या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमानं पहिल्याच दिवशी 1 कोटी रुपयांचं कलेक्शन करत साऱ्याचं लक्ष वेधलं.अवघ्या एका आठवड्यात सिनेमानं हिंदी सिनेमांना देखील टक्कर दिली आहे. सहा बायकांनी घातलेला कल्ला प्रेक्षकांनी इतका डोक्यावर घेतलाय की सिनेमाची यशस्वी घोडदौड आता पुढचे काही महिने सुरू राहिल यात काही शंका नाही. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सिनेमाच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी दमदार स्टारकास्ट असलेला बाईपण भारी देवा हा सिनेमा प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावना पडद्यावर मांडताना दिसतंय. केदार शिंदे यांचा बाईच्या मनातलं ऐकू येणं ते बाईच्या मनातलं समजून घेणं हा आतापर्यंत प्रवास त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेला आहे. हेही वाचा -  ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील गाजत असलेलं ‘हे’ गाणं, सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती

संबंधित बातम्या

बाईपण भारी देवा या सिनेमानं केवळ एका आठवड्यात तब्बल 12.50 कोटींची कमाई केली आहे. सिनेमानं दुसऱ्या आठवड्यात दमदार पदार्पण केलंय. केदार शिंदे यांनी यावर म्हटलंय, “माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य स्त्रियांच्या आशिर्वादाने हे यश मिळालंय. मला जन्म देणारी आई… सांभाळणारी आजी.. लक्ष ठेवणाऱ्या मावश्या… मला लग्नानंतर सांभाळून घेणारी माझी बायको.. आनंद देणारी माझी मुलगी.. माझ्या प्रत्येक कामात सहभागी असणारी माझी सहकारी, अभिनेत्री आणि माझ्या कामावर प्रेम करणारी स्त्री प्रेक्षक.. हे तुमचं यश आहे. या सिनेमातली प्रत्येक स्त्री जी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तीचं हे यश आहे. मी फक्त निमित्त मात्र!! ही स्वामीआई ची कृपा हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद”

पिंकविलाच्या माहितीनुसार, बाईपण भारी देवा या सिनेमानं रिलीजच्या 6.45 कोटींची दमदार ओपनिंग केली. केवळ 5 दिवसात सिनेमानं मिळवलेल्या या यशानं सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत. अनेक मराठी सिनेमांचे रेकॉर्ड बाईपण भारी देवानं मोडलेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या