JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर पाहून अशोक सराफ म्हणाले, '6 अभिनेत्रींना एकत्रित काम करताना पाहणे म्हणजे....'

'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर पाहून अशोक सराफ म्हणाले, '6 अभिनेत्रींना एकत्रित काम करताना पाहणे म्हणजे....'

बाईपण भारी देवा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहिलेल्या अशोक सराफ यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

दिग्गज अभिनेते अशोक सराफांनी केला 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून- जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. या ट्रेलर लॉंच सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे, स्टारकास्ट रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,दीपा परब चौधरी,शिल्पा नवलकर,सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई - पियूष सह सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. बाईपण भारी देवा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहिलेल्या अशोक सराफ यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “चित्रपटातील सहा अभिनेत्रीना एकत्रित पडद्यावर काम करताना पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी आहे. या सगळ्या अभिनेत्रीनी आतापर्यंत जे उत्तम काम अभिनयात केलंय ते खूप मोठं आहे म्हणूनच मी देखील चित्रपट पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे. बाईपण भारी देवा चित्रपट बॉक्सऑफिसवर उत्तम कामगिरी करेल, लोकांना हा चित्रपट आवडेल अशी मला आशा आहे.” वाचा- कंगना करतेय लग्न? कार्ड वाटून पॅप्सला दिल निमंत्रण, पण नवरा मुलगा कोण… पारंपरिक मंगळागौर नृत्याचा आनंद कलाकार आणि मिडिया यांनी घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात बाईपण भारी देवाचा ट्रेलर लाँच सोहळा जोरदार पार पडला. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ट्रेलरलाही खूप भारी प्रतिक्रिया मिळत आहेत.

जिओ स्टुडियोजचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात केलेली धमाल, अनुभवायला!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘बाईपण भारी देवा’ आता प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून 30 जून, 2023 रोजी पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या