मुंबई, 04 जून- बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी ही नेहमीच चर्चेचा विषय असते. बॉलिवूड चाहते या पार्टीची आतुरतेने वाट पाहत असतात. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातल्या एका व्हिडिओची सर्वात जास्त चर्चा झाली. या व्हिडिओत सलमानची बहीण अर्पिता खान आणि अरबाज खानची प्रेयसी जॉर्जियाचा यांच्यातले संभाषण दिसते. झालं असं की, पार्टीत जॉर्जियाने असा ड्रेस घातला होता जो अर्पिताला फारसा आवडला नाही. त्यामुळे भर पार्टीत तिने जॉर्जियाला ड्रेस नीट करण्याचं सांगितलं. व्हिडिओत अर्पिता एका टेबलवर बसलेली दिसते तर तिच्या बाजूला उभी राहून जॉर्जिया तिच्याशी बोलताना दिसते. यावेळी अर्पिता जॉर्जियाला खाली वाकायला सांगते आणि तिच्या कानात काही तरी बोलताना दिसते. फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान
अर्पिताशी बोलल्यानंतर जॉर्जिया आपली ओढणी नीट करते. पण एवढं करूनही अर्पिताला तिचा तो ड्रेस आवडत नाही. त्यानंतर अर्पिता स्वतःचा तिची ओढणी नीट करते. या इफ्तार पार्टीत जॉर्जियाने लेहंगा आणि ऑफ शोल्डर टॉप घातला होता. या भारतीय पेहरावात ती फार सुंदर दिसत होती. या घटनेचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये अर्पिताला जॉर्जियाला ओढणी नीट करण्याचा सल्ला देते. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जॉर्जियाने गळ्या भोवती ओढणी गुंडाळून घेतलेली दिसते. ‘या’ पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट
VIDEO- ‘सुपर 30’ मधल्या हृतिकला पाहून तुम्ही व्हाल दंग, असा हृतिक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेला हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी जॉर्जियाच्या वाढदिवसानिमित्ताने अरबाजने एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत सलमानचं पूर्ण कुटुंब उपस्थित होतं. आता ज्यापद्धतीने अर्पिताने जॉर्जियाला तिची ओढणी नीट करण्याचा सल्ला दिला, त्यावरून दोघींमधलं बॉण्डिंग नक्कीच चांगलं असणार असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?